विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लक्ष दिले आहे. दरम्यान, या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढणार आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्याबाबतची घोषणा केली आहे. उद्या (४ फेब्रुवारी) जागावाटप केले जाणार आहे.

हेही वाचा >>> “…ती खंत आजही माझ्या मनात,” मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत अजित पवारांनी व्यक्त केली भावना

संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाने कसबा, चिंचवड पोटनिवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच उद्या कोणती जागा कोणाला दिली जाणार, याबाबत घोषणा केली जाणार आहे. आज (३ फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे.

हेही वाचा >>>शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण…”

ही पोटनिवडणूक आम्ही एकजुटीने लढणार- नाना पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमची भूमिका स्पष्ट आहे. ही पोटनिवडणूक आम्ही एकजुटीने लढणार आहोत. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील यासाठी रणनीती तयार झालेली आहे. उद्या कोण कोठून लढणार याची घोषणा केली जाते,” असे नाना पटोले यांनी सांगितले.