येथील ओंकार कलामंच सावंतवाडी आणि ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या मालवणी महोत्सवात भन्नाट कॉमेडी आणि तितक्याच सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मालवणी महोत्सव समिती व ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांनी दिली.
पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष दादा मडकईकर, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, डी. के. सावंत, मिलिंद कासार, प्रा. हसन खान, अ‍ॅड. ऋजुल पाटणकर, निरंजन सावंत, चैतन्य सावंत, आनंद काष्टे, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.
टेंबकर म्हणाले, ‘मालवणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने येथे प्रथमच मालवणी महोत्सव होत आहे. महोत्सव २० ते २२ मे या कालावधीत येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक रणजित देसाई उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, विकास सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचा समारोप २२ ला होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, येथील कुटीर रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार आणि युवा नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील कलाकारांची टीम उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘या महोत्सवात विविधांगी मालवणी एकांकिका सादर करण्यात येणार आहेत. यात कोचरा येथील व्ह्य़ू फाऊंडर थिएटरची लगोरी, नेरूर येथील वक्रतुंड थिएटरची टक-टक, तळगाव येथील आम्ही एक कलामंचची देसरूड, गोठोस येथील श्री भावई देवी नाटय़विश्वची खेळ ऊन पावसाचो, आदित्य थिएटर मालवण यांची कुरूक्षेत्र, अक्षर सिंधू साहित्य कलामंच कणकवली यांची गावय, सावंतवाडीतील सामथ्र्य ग्रुपची वाट सुखाची आणि युवा मित्रमंडळ मळेवाड यांची गुरुदक्षिणा या एकांकिका होणार आहेत. महोत्सवाचे औचित्य साधून ओंकार कलामंचाचे कलाकार विविध नृत्यप्रकार सादर करणार आहेत. यात नृत्याच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ दर्शन, विठ्ठल दर्शन, गणेश वंदना आणि पोवाडा यांचा समावेश आहे.
रांगोळी, चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. सावंतवाडीतील प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे यांचे मालवणी संस्कृती दाखविणारे छायाचित्र प्रदर्शन असणार आहे, असे टेंबकर यांनी सांगितले.
मालवणी खाद्याची पर्वणी
टेंबकर म्हणाले, ‘या महोत्सवाचे औचित्य साधून मालवणी मुलुखातील अस्सल मालवणी खाद्याची चव उपस्थितांना चाखता येणार आहे. यात शिरवाळे, मोदक, पुरणपोळी, धोंडास, खापरोळी अशा पदार्थासोबत उकडा भात माशाची कडी, चिकन-मटन आदी मालवणी पदार्थ तसेच बिर्याणी आणि कोल्हापुरी व अन्य जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malvani festival in sawantwadi
First published on: 20-05-2016 at 01:08 IST