scorecardresearch

Premium

“आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…”

मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागेल, असं म्हटलं. याबाबत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde Manoj Jarange Ajit Pawar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार मराठा समाजाबरोबर असल्याचं म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं. मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागेल, असं म्हटलं. याबाबत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (११ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. त्याचा उपोषणाचा १४ वा दिवस आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजावून सांगावं लागेल म्हणत असतील, तर ते यातील आणि आम्हाला समजावून सांगतील. ते त्यांचं काम आहे. आम्ही त्यांना कुठं म्हटलं की, समजावून सांगायला येऊ नका. त्यांचं ऐकणं आमचं काम आहे. बघू, ते काय समजावून सांगतात.”

Eknath SHinde uddhav Thackeray (3)
“मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”
ajit pawar
भर सभेत अजित पवारांचे मुख्यमंत्रिपदावर भाष्य, कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले; “बाबांनो जरा…”
modi in rajyasabha
“मला कोणतेही आरक्षण आवडत नाही”; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलेल्या नेहरूंच्या ‘त्या’ पत्रात काय लिहिले आहे?
Maratha community Chief Minister Eknath Shinde Upcoming Lok Sabha and Assembly Elections
मराठा समाजाचा कैवारी म्हणून प्रतिमा उंचविण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर!

“आमचं काही द्यायचं म्हटलं की वेळ लागतो, बाकीच्यांना…”

आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही? असा प्रश्न विचारला जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारलं. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “७५ वर्षे झाली आम्ही वेळ द्या हेच ऐकत आहोत. इतकी वर्षे तेच चालू आहे. आमचं काही द्यायचं म्हटलं की वेळ लागतो. बाकीच्यांना काही द्यायचं म्हटलं की, वेळच लागत नाही.”

हेही वाचा : “पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले

“आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, तर वेळ द्या म्हणत आहेत”

“कितीतरी जाती एका रात्रीत ओबीसी आरक्षणात घातल्या आहेत. तेव्हा यांना वेळ लागला नाही. तेव्हा आम्ही सरकारला विचारलंही नाही की, इतरांचा ओबीसीत समावेश का केला. आता आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, तर वेळ द्या म्हणत आहेत. अजित पवार म्हणतात त्यांना समजावून सांगावं लागेल. माझी तयारी आहे. ते काय समजावून सांगतात सांगा,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange comment on cm eknath shinde ajit pawar statement maratha reservation pbs

First published on: 11-09-2023 at 15:54 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×