scorecardresearch

Premium

“मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे…”, मनोज जरांगेंचं मोठं विधान, म्हणाले, “आता…”

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशीवमध्ये मोठं विधान केलं. तसेच सरकारला ५ हजार कागदपत्रे सापडली आहेत. आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही केला.

Fadnavis Jarange Shinde
मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशीवमध्ये मोठं विधान केलं. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशीवमध्ये मोठं विधान केलं. “मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत,” असा दावा मनोज जरांगेंनी केला. तसेच सरकारला ५ हजार कागदपत्रे सापडली आहेत. आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही केला. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) धाराशीवमध्ये बोलत होते. जरांगे धाराशीवबरोबरच सोलापूरचाही दौरा करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आयोगाचे सदस्य सनाट गेले आणि म्हटले कुणबी नोंदीची ५ हजार कागदपत्र सापडले. आता कागदपत्र कसे सापडले. आता आमचं कसं ठरलं होतं ते सांगतो. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार द्यावा लागतो. त्याशिवाय कायदा पारित होत नाही. जर आधार दिला तर त्या कायद्याला आव्हान देण्याची हिंमत कुणातही नसते.”

Devendra Fadnavis statement on manoj jarange
सरकारने आरक्षण दिले, आता जरांगेंनी अट्टहास सोडावा – देवेंद्र फडणवीस
Nitesh Rane
“पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…
Discussion on Ram Temple construction proposal in Lok Sabha
मराठी खासदारांची फटकेबाजी; लोकसभेत राम मंदिर निर्माण प्रस्तावावर चर्चा
Mallikarjun Kharge
राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!

“मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे…”

“आता मराठा आणि कुणबी एकच असल्याचा ५ हजार पानांचा आधार मिळाला आहे. आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे. यांना नेमका किती आधार पाहिजे हे त्यांनी आम्हाला एकदाचं सांगावं. यांना ५ हजार पानांचा आधार मिळाला आहे, आता काय यांना ट्रकभर पुरावे द्यायचे का. त्यामुळे त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत याचे माझ्याकडे पुरावे आहेत. या कागदावरही सरकारला आरक्षण देता येतं,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

“…तर मी समोरच्याला सोडतच नाही”

दरम्यान, छगन भुजबळ म्हणाले होते, “माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. केवळ मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. हे माझं एकट्याचं मत नाही. सगळेजण याच मताचे आहेत. मी काही एकटा अशा मताचा नाही. परंतु, मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा.”

हेही वाचा : “…आता तुम्ही गप्प बसा”, शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची रोखठोक भूमिका

छगन भुजबळांच्या या टीकेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले होतं, “मी स्वत: आधी टीका करत नाही. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. समोरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केला तर मी त्याला सोडतच नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil big statement about maratha kunabi reservation in dharashiv pbs

First published on: 05-10-2023 at 12:16 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×