मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जे काही रविवारी सरकारने केलं ते काही चांगलं नाही. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे. ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी जर लाठीचार्ज केला असता तर त्याला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण राज्य पेटलं असतं. डोकं ठिकाणावर ठेवून आणि विचार करुन बोला असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. विचार करुन बघा काल काय झालं असतं? तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळालं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा विचार करणं आवश्यक आहे. राज्यातल्या सगळ्या नागरिकांनीही विचार केला पाहिजे.” असं मनोज जरांगे म्हणाले. आज मनोज जरांगे यांनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!

देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी मी पार पाडली

“मी प्रामाणिकपणे सांगतो आहे.. काहीही गैरप्रकार घडू नये ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी होती. ती जबाबदारी मी पार पाडली. पाच हजार महिला या ठिकाणी होत्या, तर २० हजार लोक होते. देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. लोक सैरावैरा रानात पळाले असते. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा आंतरवली सराटीसारखा लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे. पहिला हल्लाही देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणला होता. “

हे पण वाचा- “मनोज जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालल्या आहेत, आता..”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

तर मराठा समाज पेटून उठला असता

“इथे आज सकाळी किंवा रात्रीसुद्धा लाठीचार्ज झाला असता तर सर्व मराठा समाज पेटून उठला असता. पुन्हा एकदा राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिल्या लाठीचार्जनंतर जो उद्रेक झाला त्यातल्या केसेस अजूनही मागे घेण्यात आलेल्या नाहीत. त्यांना आतापर्यंत वाटलं असतं की, माझी जनता आहे. तर त्यांनी केसेस मागे घेतल्या असत्या. त्यांनी पोलीस बाजूला सारावेत. सागरचा दरावाजा उघडावा मी यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी तयारीला लागा” असंही जरांगे म्हणाले.