जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणाचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले असून काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव येथे धान्याच्या शासकीय गोदामास आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले. या घटनेत एकूण ३ लाख ८८ हजार ६०० रुपयाचे नुकसान झाले.

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आले. तर सेनगाव येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारी आखाडा बाळापूर, दिग्रस आमि कऱ्हाळे येथे रास्ता रोको झाले. उद्या सोमवारी मराठा समाजाने हिंगोली जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. उद्याचा बंद शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली.

हेही वाचा- “नितेश राणे आता तोंडात बोळा घालून…”, एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेनगाव येथे अज्ञातांनी रास्त भाव दुकानाच्या शासकीय गोदामास आग लावली. यामध्ये बारदाना २१ हजार पोते, तांदळाने भरलेले १०२ कट्टे जळून खाक झाले. यामध्ये एकूण २ लाख ८८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. तसेच संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला (एमएच ३८, जी २८२८) आग लावली. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले. याप्रकरणी दिलीप भीमराव कदम (गोदामपाल) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.