scorecardresearch

Premium

Maharashtra News: “आपण प्रचंड आगतिकतेचे शिकार झाला आहात याची…”, रुपाली चाकणकरांची सूचक पोस्ट!

Marathi News Today, 04 October 2023: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

rupali chakankar
रुपाली चाकणकर (संग्रहीत छायाचित्र)

Mumbai Maharashtra Today: राज्यात सध्या सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन पक्षांमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे शिवसेनेतील सत्ताधारी शिंदे गट व विरोधातील ठाकरे गट यांच्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गट व विरोधातील शरद पवार गट यांच्यातील पक्षनाव व चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आहे.

Narayan Range Manoj Jarange
“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”
devendra fadnavis chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”
Manoj Jarange Eknath Shinde
मराठा आरक्षणप्रश्नी मागासवर्ग आयोगाच्या हालचालींना वेग, ‘ही’ महत्त्वाची माहिती गोळा करण्यास सुरुवात
Manoj Jarange Patil Maratha reservation
मराठा समाजाच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? मनोज जरांगेंनी वाचली यादी
Live Updates

News in Marathi: आमदार अपात्रतेच्या मुद्द्याचं काय होणार?

18:55 (IST) 4 Oct 2023
डोंबिवलीतील डी मार्टमध्ये चोरी करण्याचा महिलेचा प्रयत्न

डोंबिवली: येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट मध्ये सामान खरेदीसाठी आलेल्या एका ४५ वर्षाच्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अंगावरील कपड्यांमध्ये २२ हजार रुपयाहून अधिक किमतीचा माल चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा…

18:39 (IST) 4 Oct 2023
पीकविम्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक

वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

17:53 (IST) 4 Oct 2023
रुपाली चाकणकर यांची खोचक पोस्ट…

रुपाली चाकणकर यांची खोचक पोस्ट…

एखादी व्यक्ती आपल्या सोबत असली की त्याची किंमत कळत नाही परंतु ती व्यक्ती आपल्यातून दूर निघून गेली की त्याचं असणं आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या राजकीय भवितव्यासाठी किंवा एखाद्या पुरस्कारासाठी किती महत्वाचं असतं, हे प्रकर्षाने जाणवतं. काही जणांच्या मनाची अवस्था अगदी अशीच झाली आहे , सोबत असताना कधी नाराजीची जाणीव झाली नाही पण आता ती व्यक्ती आपल्या सोबत नसल्यावर अर्धवट माहितीच्या आधारावर कोणत्यातरी 'सूत्रांच्या' हवाल्याने वक्तव्य हे खरं म्हणजे प्रचंड आगतिकतेची आपण शिकार झाला आहात याची मनोमन खात्री पटते.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1709482484189298956

17:43 (IST) 4 Oct 2023
लेझर प्रकाशझोत ग्रहणातील सूर्यकिरणांइतका घातक, सार्वजनिक लेझर वापरावर बंदीची गरज

ग्रहणातील सूर्यकिरणांइतका घातक असलेल्या लेझर प्रकाशझोताच्या सार्वजनिक वापरावर बंदी घालण्याची किंवा त्याच्या वापराबाबत काही नियम घालण्याची आवश्यकता वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

17:32 (IST) 4 Oct 2023
चंद्रपूर : कालबाह्य २१० मेगावॉट संचाच्या चिमण्या पाडल्या

महाऔष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे कालबाह्य झालेले १ व २ क्रमांकाचे संच पाडण्यात येऊन जागा मोकळी करण्यात आली. ही प्रक्रिया वीज केंद्राच्या वतीने बुधवारी पूर्ण करण्यात आली.

सविस्तर वाचा

17:30 (IST) 4 Oct 2023
शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री शिंदे; वाघनखं भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

चंद्रपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीसुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

सविस्तर वाचा…

17:23 (IST) 4 Oct 2023
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पथकावरच फेरीवाल्यांची दादागिरी

नवी मुंबई: अनधिकृत फेरुवाल्यांनी कारवाई करणाऱ्यांवरच दादागिरी केली. त्यांच्याशी झटपटही केली. याचे मोबाईल चित्रण सध्या व्हायरल होत असून अनधिकृत फेरीवाल्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 4 Oct 2023
नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींसाठी शहरात वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 4 Oct 2023
एसआरए प्राधिकरणाची जबाबदारी महानगरपालिकेच्या खांद्यावर; मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एसआरए वसाहतीमधील प्रसाधनगृहांची दुरुस्ती महानगरपालिका करणार

परिसर व शौचालयाची दूरवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या दौऱ्याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल उपस्थित होते.

सविस्तर वाचा…

17:16 (IST) 4 Oct 2023
नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप

खासदार हेमंत पाटील यांच्या गैरवर्तणुकीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 4 Oct 2023
तापी जलवाहिनीला गळती; धुळ्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 4 Oct 2023
नाशिक : विनाहेल्मेट कामगारप्रश्नी कंपनी मालकांना दोषी धरणे अयोग्य, निमाचे प्रादेशिक परिवहनला साकडे

कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घातल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार त्यासाठी कंपनी मालकाला दोषी धरण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

17:14 (IST) 4 Oct 2023
मालेगावात रोहिंगे, बांगलादेशी आढळल्यास राजकारणातून संन्यास, माजी आमदार आसिफ शेख यांचे आव्हान

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे मुसलमानांची संख्या वाढत असल्याचे विधान करत चिंता व्यक्त केली होती.

सविस्तर वाचा…

17:14 (IST) 4 Oct 2023
इगतपुरीतील तीन कुख्यात गुन्हेगार ताब्यात

संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 4 Oct 2023
“..तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते”, आमदार मिटकरी म्हणतात, “हिंदू आक्रोश मोर्चे बंद…”

वाशीम : भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते. भाषणे केल्याने पक्ष वाढत नाही. जर तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 4 Oct 2023
कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने हसन मुश्रीफ यांचे स्वप्न अखेर साकार

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची बनली असताना त्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे. अनेकदा मंत्रिपद किंवा अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हुलकावणी देत असल्याची हुरहूर त्यांना होती.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 4 Oct 2023
१२ वर्षांपासून फरार, नंतर आत्मसमर्पण, कारण ऐकल्यावर बसेल धक्का

नागपूर: हत्येप्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेच्या काळात तो पॅरोलवर बाहेर आला आणि नंतर तो कारागृहात परतलाच नाही. तब्बल १२ वर्षे तो फरार होता. मात्र अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 4 Oct 2023
पालकमंत्रीपदाच्या चर्चेत मी नाही – छगन भुजबळ

नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल हे मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नाही. याचं चांगलं उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. माझी इच्छा काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत. सहा आमदार आहेत. सातवे खोसकरही आमचेच आहेत. त्यामुळे तिथे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे. रायगडच्या बाबतीतही आमचे आमदार मंत्री आहेतच. पण आमचे खासदार आहेत. कोकण विभागात एक तरी जिल्हा आम्हाला हवाय ही आमची भूमिका आहे. आता त्यावर काय तोडगा निघतो बघू – भुजबळ

15:44 (IST) 4 Oct 2023
रोहित पवारांचं सूचक ट्वीट! म्हणाले…

माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं – रोहित पवार

https://twitter.com/RRPSpeaks/status/1709477835541242176

15:38 (IST) 4 Oct 2023
पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’; पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटलांना ठरले वरचढ

जिल्ह्याचा दादा कोण यावरून चंद्रकांत पाटील आणि उपमु़ख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानाच अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

15:28 (IST) 4 Oct 2023
नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात होणार सुनावणी…

रूग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयानं घेतली दखल. गुरुवारी होणार तातडीची सुनावणी

15:17 (IST) 4 Oct 2023
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र

काही आठवड्यांपूर्वी ठाणे (बेकायदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) आणि गेल्या तीन दिवसांत नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका राज्यात एका सरकारी रुग्णालयात फक्त ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मरण पावतात याची कल्पनाही करवत नाही. त्याहून वाईट म्हणजे राज्य सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेमुळे नवजात बालकांचा यामुळे मृत्यू व्हावा.

हे सगळं घडत असताना आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी गेले. पण त्यांनी या शहरांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली नाही.

जर मी मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा किंवा त्यांच्या सुट्टीचा मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता या घडीला ते बाहेर सुट्टीवर असते.

आज ते पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात व्यग्र आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ते वाद घालत होते. पण या राष्ट्रीय आपत्तीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

हे अवमानकारक आणि धक्कादायक आहे. पण मिंधे व भाजपाच्या अकार्यक्षम, घटनाविरोधी व हुकुमशाही वृत्तीच्या सरकारला हे साजेसंच आहे.

मी राज्य सरकारला मुंबई महानगर पालिकेच्या व राज्य सरकारच्या मुंबईतील रुग्णालयांतल्या परिस्थितीविषयी २९ सप्टेंबर रोजीच राज्य सरकारला लेखी कळवलं आहे. अशी परिस्थिती पुन्हा ओढवू शकते असा इशाराही दिला आहे.

आता हे महाराष्ट्रविरोधी अकार्यक्षम सरकार चालवण्याची मुख्यमंत्र्यांना थोडी तरी शरम वाटेल का? ते आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतील का? या सगळ्या पार्श्वभूमीवर ते स्वत: राजीनामा देतील का?

15:17 (IST) 4 Oct 2023
सत्ताधाऱ्यांकडून गांधींच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरविण्याचा प्रयत्न – वडेट्टीवार

चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे महात्मा गांधी यांची त्याग व बलिदानाची गाथा साता समुद्रपार पोहोचली असून अनेक देशातील महत्त्वकांक्षी लोक गांधी विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, देशातील सत्याधाऱ्यांकडून महात्मा गांधींना बदनाम करून त्यांच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरवित धर्मांधता व जातीय भेदाचे राजकारण करून अराजकता माजविण्याचे काम सुरू आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सविस्तर वाचा…

15:12 (IST) 4 Oct 2023
रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल का? भरत गोगावले म्हणतात…

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कदाचित अद्याप झाला नसावा. उदय सामंतांकडे अर्थात रायगडचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच आहे. त्यामुळे तशी अडचणीची काही बाब नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आमची धावपळ चालू आहे. पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीपदाबाबत त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतील – भरत गोगावले

15:05 (IST) 4 Oct 2023
पुणे : फिरत्या हौदांकडे पुणेकरांची पाठ! करदात्यांचे एवढे कोटी खर्च

फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन होत नसतानाही फिरत्या हौदाची सुविधा देण्याचा घाट महापालिकेने घातल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी फिरत्या हौदांमध्ये १३ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा त्याहीपेक्षा कमी केवळ १०.५ टक्के मूर्तींचे विसर्जन झाले.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 4 Oct 2023
बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर; दिव्यांग मंत्रालय विभाग केवळ नावापुरतेच!

वाशिम : सरकारने मला दिव्यांग मंत्रालय खाते दिले. मात्र, हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना घोडी, ना कोणतेही अधिकार. मात्र समाधान याचे आहे. की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या अडचणी समजून घेऊन येणाऱ्या काळात दिव्यांगाचे दुःख कमी करून तुमच्यासाठी लढत राहील, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी केले.

सविस्तर वाचा..

15:02 (IST) 4 Oct 2023
आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मी जर मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता ते विदेशात सुट्टीवर असते – आदित्य ठाकरे

https://twitter.com/AUThackeray/status/1709489563205616039

14:58 (IST) 4 Oct 2023
महाराष्ट्रातले १२ पालकमंत्री बदलले…

बदललेल्या पालकमंत्र्यांच्या नावांची यादी मुख्यमंत्र्यांनी एक्सवर केली पोस्ट

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1709482937488723981

14:48 (IST) 4 Oct 2023
आदिवासी विकास मंत्र्यांची गाडी अडवली, नागपुरात आंदोलकांची मागणी काय पहा..

नागपूर: आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (४ ऑक्टोंबर) नागपुरातील संविधान चौकात आदिवासी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 4 Oct 2023
अजित पवारांच्या मनासारखे झाले; भुजबळ, तटकरे यांची इच्छापूर्ती नाही

पालकमंत्रीपदाच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनासारखे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी छगन भुजबळ व सुनील तटकरे यांची इच्छापूर्ती मात्र झालेली नाही. राष्ट्रवादीच्या नऊपैकी सात मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 4 Oct 2023
डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम

डोंबिवली: वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणे, रेल्वे प्रवेशव्दारात रस्ता अडवून रिक्षा उभी करणे, अशा डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बेशिस्त रिक्षा चालकांवर येथील वाहतूक विभागाने मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे, ई चलान माध्यमातून कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 4 Oct 2023
खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्डचा इशारा

हेमंत पाटील यांनी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा केंद्रीय मार्डकडून देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 4 Oct 2023
खासगी इमारतींच्या पुनर्विकासातील विरोधकांना तूर्तास अभय!

राज्य शासनाने महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यात सुधारणा करीत पुनर्विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 4 Oct 2023
नांदेड रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : सुषमा अंधारे

पुणे : नांदेड येथील रुग्णालयात २४ नागरिकांचा बळी गेला असून त्या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. तर या विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली, पती अगोदर परतला; मात्र तिला काळाने गाठले…

बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली… पती अगोदर परतला… दुसऱ्या दिवशी भावासह सासरी निघाली असता रोही च्या रुपात साक्षात काळ आडवा आला अन तिचा करुण अंत झाला.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 4 Oct 2023
पालकमंत्रीपदाचं फेरवाटप.. यादी जाहीर!

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

13:37 (IST) 4 Oct 2023
गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच

गोंदिया : गेल्या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे तुडुंब होत आहेत. यंदाही ४३ जलाशये तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. तर ७ जलाशयांमध्ये ९० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रबी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सविस्तर वाचा…

13:23 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा : ‘मॉडेल डिग्री’ महाविद्यालयासाठी ८३ कोटी मंजूर; उपकेंद्र कार्यान्वित होण्याची चिन्हे

शैक्षणिकदृष्ट्या मागास १६ जिल्ह्यांसाठी २०११ मध्ये मॉडेल कॉलेज मंजूर करण्यात आले होते. यात बुलढाण्यातील महाविद्यालयाचाही समावेश होता.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 4 Oct 2023
चंद्रपूर : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह चौघांवर गुन्हे दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, महेश जीवतोडे, अमित निब्रड यांनी सदर प्रकरणात कंपनीचे प्रतिनिधी उदया लक्ष्मण नायक यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 4 Oct 2023
मुंबई सेंट्रल जवळ लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 4 Oct 2023
हे मुद्दाम चाललंय का? मनसेनं ‘त्या’ मुद्द्यावर घेतला आक्षेप!

हे मुद्दामहून सुरु आहे का ? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का? – मनसेचा तीव्र आक्षेप

https://twitter.com/mnsadhikrut/status/1709467167954280779

12:59 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा : …अन् म्हणे गतिमान सरकार! जुलै महिन्यातील अतिवृष्टीची मदत ऑक्टोबरमध्ये!

बुलढाणा: जुलैमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मदत निधी ऑक्टोबरमध्ये मंजूर करण्यात आल्याने लाखो शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 4 Oct 2023
“सव्वालाख स्वयंसेवक ‘इंडिया’चा प्रचार करणार”, योगेंद्र यादव यांची माहिती; म्हणाले…

नागपूर : मोदी सरकार सर्वच यंत्रणांचा ताबा घेत असून लोकशाहीचा गळा आवळत आहे. राज्यघटनेचा पाया कमकुवत करीत आहे. या हुकूमशाही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ‘जितेगा इंडिया बनेगा भारत’ अभियानाअंतर्गत सव्वालाख स्वयंसेवक देशातील १५० लोकसभा मतदारसंघात कार्य करतील, अशी माहिती स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 4 Oct 2023
खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

अकोला : पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

सविस्तर वाचा..

12:44 (IST) 4 Oct 2023
मुंबईत पदपथावरील मार्ग प्रतिबंधक अपंगांसाठी ठरत आहेत अडथळा, उच्च न्यायालयाकडून दखल

मुंबई: मुंबईतील पदपथावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेले मार्ग प्रतिबंधक (बोलार्डस्) अपंग व्यक्तींसाठी अडथळा ठरत असल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 4 Oct 2023
“सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकारांच्या घरी छापे, अटकसत्र,” योगेंद्र यादव यांचा आरोप

पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून मोदी सरकारने त्याच्या घरी धाडी घातल्या, त्यांना कित्येक तास ताब्यात ठेवले. आणि काहींना अटक केली, असे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 4 Oct 2023
मुद्रणालय कामगारांना १६ हजार रुपये दिवाळी बोनस

कामगारांना या वर्षी १६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक बोनस असल्याचे सांगितले जाते.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 4 Oct 2023
खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

अकोला : पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 4 Oct 2023
गोदावरीची सद्यस्थिती अतिदक्षता घेण्यासारखी, अवैध उत्खनन रोखण्यासाठी ब्रह्मगिरीचे सीमांकन गरजेचे – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

ब्रह्मगिरीवरील उत्खननाने बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारकडे दाद मागून हे संपूर्ण क्षेत्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 4 Oct 2023
नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील मृत्युसत्राप्रकरणी याचिका दाखल करा, स्वतःहून दखल घेण्याची मागणी करणाऱ्या वकिलाला उच्च न्यायालयाचे आदेश

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

shivsena supreme court shinde thackeray

(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

News in Marathi: सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील वादांवर सुनावणी!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Marathi live news maharashtra hospital death update shivaji maharaj wagh nakh news mumbai pune nagpur breaking news pmw

First published on: 04-10-2023 at 10:16 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×