Maharashtra Political New Live Updates, 18 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. काही ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी फुटली आहे तर काही ठिकाणी कट्टर शत्रू एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच नाशिक-मालेगावमध्ये भाजपाने शिवसेनेला (उबाठा) धक्का दिला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे (उबाठा) उपनेते अद्वैत हिरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
दुसऱ्या बाजूला पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपयांच्या नोटिशीवर कंपनीने १४ दिवसांची मुदत मागितली होती.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सीएनजीचा पुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. काही सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सीएनजी पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईच्या दुरुस्तीचं काम आजही चालू राहणार आहे.
Latest Maharashtra News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च कमांडर माडवी हिडमा पत्नीसह चकमकीत ठार; सुरक्षा दलांना मोठे यश
सांगलीतही बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये धास्ती
दिल्लीतील स्फोटावरून स्वामी गोविंददेव गिरी यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला…
वरळी येथील हिट अँड रन प्रकरण: आरोपी मिहीर शहाच्या जामीन अर्जावरील निर्णय राखीव
भाजप, शिवसेनेच्या कुरघोडीने अजित पवार एकाकी
पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट, आघाडीत बिघाडी… जाणून घ्या प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या लढती
नगराध्यक्षपदासाठी "मामुली" मतांवर भिस्त; गणिताची आकडेमोड सुरू
विक्रोळी - माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप
ओबीसी मधून निवडणूक लढण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते विकास गवळी असे का म्हणतात?
महाराजांचा पुतळा पुन्हा बंदिस्त; ‘गनिमिकाव्याने स्मारक खुले करू’ - मनसेचा इशारा
उमेदवारी नाकारल्याने मानसिक धक्का, शिंदेसेनेच्या महिला प्रमुख बेपत्ता...
Thane CNG Shortage : सीएनजी तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी हाल, बसगाड्यांच्या थांबावर रांगा, अनेकांची पायपीट
नागपूर 'आरटीओ'त चाललंय तरी काय? अधिकाऱ्याला अडकवण्यासाठी कटकारस्थान; परिवहन अधिकाऱ्यांची नीतिमत्ता रसातळाला....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेच्या विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून २० ते २५ मिनिटे उशिराने गाड्या धावत आहेत.
अमित ठाकरे म्हणाले, "एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. कारण महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. महाराजांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी जे काही सहन करावं लागेल, ते सगळं आम्ही आनंदाने सहन करू."
https://twitter.com/amitrthackeray/status/1990450197600817639?s=20
