बीड : गेल्या काही महिन्यापासून विविध घटनांमुळे बीड जिल्ह्याचे नाव राज्यभरात चर्चेत राहिले होते.लोकसभा निवडणुकी पासून याला सुरुवात झाली.आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही जिल्ह्यात अनेक घटना झाल्या.पुढे जिल्ह्यात गुन्हेगारीच अनेक उदाहरण पाहायला मिळाले.यामुळे जिल्ह्याची बदनामी झाल्याचे दिसून आले होते.आता मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे रविवारी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा च्या कार्यक्रमानिमित्त बीडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलत असताना त्यांच्या पालकमंत्री काळातल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.मी पालकमंत्री असताना जलसंधारण आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची काम झाल्याचे त्या म्हणाल्या.येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या जिल्ह्याचे नाव मोठ करायचे असून या जिल्ह्याची मान खाली घालणाऱ्याला थाराही द्यायचा नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाकडून आढावा घेऊन उद्या कॅबिनेट बैठकीत याची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरकारची मानसिकता शेतकऱ्यांच्या मागे राहण्याची आहे.पुढे बोलतांना ओबीसी मराठा संघर्ष आहे मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जात आहे मी तसे चष्मे लावून फिरत नाही म्हणून त्या पद्धतीने मला पाहायला मिळत नाही. मी एखाद्या माणसाकडे बघत असताना जातीचा रंग पाहत नाही.. त्यामुळे कदाचित तसे मला दिसत नसावा असे मुंडे म्हणाल्या.
अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागत आहेत.तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक असून जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक आहे.यातून मार्ग काढणे हे नेत्याचे कर्तव्य आहे.आत्ताच्या राज्यकर्त्यांनी राजा सारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजेसामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लागता.हा निर्णय घ्यावा.
यावेळी येऊ घातलेल्या दसरा मेळाव्याबाबत बोलत असताना दरवेळी दसरा मेळावा विशेषच असतो,गावागावात तयारी पूर्ण झाली असून लोकांच्या मनात उत्साह आहे. ती परंपरा असून स्वाभिमानाची निशाणी आहे या मेळाव्यात कुठलाही हेतू नाही,तीन दशकांपासून दसरा मेळावा सुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.