पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या २४ तासात कोकणात मुसळधार, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा, तर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे.