मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र,अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. दुसरीकडे राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल, असं वक्तव्य केलं. यावर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मनसेही महायुतीत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सत्तारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (१६ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्दुल सत्तार म्हणाले, “मनसेने कोणाबरोबर जायचं हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचं स्वागतच आहे.”

“शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे”

“आमच्या सर्वच नेत्यांनी त्यांना आमच्याबरोबर येण्याचं आव्हान केलं आहे. परंतु शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे. ते काय निर्णय घेणार हे इतर कोणालाही सांगता येणार नाही,” असं मत अब्दुल सत्तारांनी व्यक्त केलं.

“महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही”

महाविकासआघाडीच्या महामोर्चावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये इतकी दक्षता ठेवावी. शेवटी मोर्चा काढण्याचे काही नियम आणि धोरण आहे. त्यांनी त्याचं पालन करावं आणि मोर्चा काढावा.”

“आम्ही कोणालाही अडवलेलं नाही”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसं स्पष्ट सांगितलं आहे की, आम्ही कोणालाही अडवलेलं नाही,” असंही सत्तारांनी नमूद केलं.

हेही वाचा : “दारूगोळा साठवून ठेवतोय, प्रत्येक ठिकाणी…”, राज ठाकरेंचं सूचक विधान; विरोधकांना दिला इशारा!

अब्दुल सत्तारांनी ठाकरे गटालाही टोला लगावला. ते म्हणाले, “ठाकरे गटाला खिंडार तर पडलेलं आहे. खिंडार पडलेल्या पक्षाला आणखी किती खिंडार पाडणार.” “आज शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी घोषणा करतील त्या आदेशाचं कृषी विभाग तंतोतंत पालन करेल,” असं त्यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister from eknath shinde faction comment on mns raj thackeray pbs
First published on: 16-12-2022 at 12:27 IST