सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालय पुढील एक वर्षात अधिकाधिक सुविधामुळे ‘मेडिकल हब’ बनेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांचा लोकार्पण सोहळा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या कार्यक्रमास आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. इद्रिस नायकवडी, समित कद म, प्रा.पद्याकर जगदाळे आदी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी स्वागत केले. तर डॉ. रूपेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या रूग्णालयात येणारा प्रत्येक माणूस बरा होवूनच जाईल. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात शासन कुठे कमी पडणार नाही. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षभरात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास २०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
३० कोटी रूपये खर्चून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डिजिटल अँजीओग्राफी मशीन, व्हॅस्कुलर अँड इंटरव्हेन्शल रेडिओलॉजी विभाग मंजूर करण्यात आले. त्यामुळे मेंदु मधील गुंतागुंतीचे ऑपरेशन निदान, पॅरालायसीस, ब्रेन स्ट्रोक, याचे निदान करणे सोपे झाले आहे. येणार्या वर्षभरात सर्व आरोग्य सुविधा पूर्ण होतील व मिरज हे चांगले मेडिकल हब होईल, असा विडास व्यक्त करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सिव्हील हॉस्पिटल सांगलीसाठी एमआरआय व मिरज शासकीय रूग्णालयासाठी सिटी स्कॅन उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.