विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फारसं महत्त्वं दिलं जात नाही. त्याउलट राजकीय भाषणांसाठी खूप वेळ दिला जातो असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत फार वेळ दिला जात नाही.

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील म्हणाले की, मी आत्ताच विधानसभेचं अधिवेशन पाहिलं. या अधिवेशनात पूर्वी शेतकऱ्यांवर बराच वेळ चर्चा व्हायची. त्यांचे प्रश्न मांडले जायचे. परंतु एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो. विधानसभेच्या अधिवेशनात राजकीय भाषणांसाठी एक-एक तास वेळ दिला जातो. परंतु प्रश्न मांडायचे असतील तर अर्धा ते एक मिनिटाला बेल वाजवली जाते.

हे ही वाचा >> “संभाजीनगरमधल्या दंगलीला वेगळा रंग देऊ नका, ती अंतर्गत…”, अजित पवारांनी विरोधी पक्षांसह माध्यमांचे कान टोचले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांचे प्रश्न माडताना माईक बंद केला जातो

पाटील म्हणाले की, राजकीय भाषण सुरू असताना बेल वाजवली जात नाही. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असतील तर लगेच बेल वाजवली जाते. सर्वसामान्यांच्या गोष्टी मांडायला गेल्यावर कधीकधी माईक देखील बंद केला जातो, यात बदल झाला पाहिजे.