गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यानंतर अयोध्येत दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यापाठोपाठ आता काशी व मथुरा येथील मंदिरांचा मुद्दाही जोरकसपणे मांडला जात असून ज्ञानवापी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीदची एक वीट राज ठाकरेंना भेट म्हणून दिली. यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांना त्यावर प्रतिक्रिया दिली.

बाळा नांदगावकरही तेव्हा अयोध्येत होते!

बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येतील कारसेवेत बाळा नांदगावकरांचाही समावेश होता, असं राज ठाकरे म्हणाले. “बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Raj Thackeray Padawa Melava
MNS Gudi Padwa Melava : अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? राज ठाकरेंनी शिवतीर्थवरून सांगितला घटनाक्रम, म्हणाले….
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

“तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत”, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी यावेळी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेच आमच्यासाठी बाळासाहेब – बाळा नांदगावकर

राज ठाकरेच आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली. “तो प्रसंग फार बाका होता. तेव्हा माहिती नव्हतं की परत जिवंत येऊ की नाही. माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. त्याला आता ३२ वर्षं झाली. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरेंनी लता मंगेशकरांशी बोलणं का सोडलं होतं? काय होता तो किस्सा?

“ते’ कार्यालय यशवंत जाधवनं गिळंकृत केलं”

“मी दोन विटा आणल्या होत्या. माजगावचं कार्यालय बांधताना तिथे खाली एक वीट ठेवली होती. ते कार्यालय मी मनसेत आल्यानंतर शिवसेनेला सुपूर्त केलं होतं. आता ते कार्यालय यशवंत जाधवनं गिळंकृत केलं आहे. दुसरी वीट मी ३२ वर्षांपासून जपून ठेवली होती”, असंही ते म्हणाले.