तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुंबईतल्या मुलुंडमध्ये घर नाकारण्यात आलं. त्यानंतर मनसेने इंगा दाखवला आणि या सोसयाटीच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली. मात्र तृप्ती देवरुखकर या पोलिसात गेल्या. आता पोलिसांनी या प्रकरणी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे प्रकरण २८ सप्टेंबरला चांगलंच गाजलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ शेअर करत आपल्यालाही घर नाकारलं गेल्याचं म्हटलं. या व्हिडीओनंतर मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी पंकजा मुंडेंना आवाहन केलं आहे.

काय म्हणाल्या शालिनी ठाकरे?

पंकजा मुंडेंना मराठी म्हणून घर नाकारल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी विडिओ मधून सांगितले. पंकजा ताई, तुम्ही सुद्धा जर मनसेला आवाज दिला असता तुम्हालाही आम्ही न्याय मिळवून दिला असता.

हे पण वाचा- आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल! “मराठी माणसाला मुंबईत घर नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार की दिल्लीश्वरांपुढे…?”

पंकजा मुंडेंनी काय म्हटलं?

सरकारी घर सोडून जेव्हा स्वत:चं घर घ्यायची वेळ आली, तेव्हा असाच अनुभव आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं. तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की ‘मराठी लोकांना आम्ही घर देत नाही’ माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, समाजातलं वातावरण हे सगळं पाहाता समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी भांडणं चालू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, पिवळा, निळा.. हे फार दुर्दैवी आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मी कोणत्या एका भाषेची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषा, जात, धर्मानं नटलेलं आहे. ही देशाची राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे. इथे सगळ्यांचं स्वागतच आहे. पण आम्ही अमुक लोकांना घर देत नाही असं जर काही इमारतींमध्ये बोलत असतील, तर हे दुर्दैवी आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “…तर गालावर वळ उठतील हे नक्की”, राज ठाकरेंनी ‘त्या’ प्रकारावरून दिली तंबी; म्हणाले, “मराठी आहे म्हणून…!”

तृप्ती देवरुखकर यांच्याबाबत नेमकं घडलं काय?

गुरुवारी तृप्ती देवरुखकर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात मुलुंड वेस्टमधील शिवसदन नावाच्या सोसायटीमध्ये आपण महाराष्ट्रीयन, मराठी असल्यामुळे आपल्याला कार्यालयासाठी जागा नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत शिवसदन सोसायटीचे अरेरावी करणारे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांना जाब विचारला. या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांची माफीही मागितली. तसेच, महाराष्ट्रातील मराठी माणसांचीही माफी मागितली.