नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे. राज यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांना मनसेचा बिनशर्त पाठिंबा जाहीर करून त्यांच्या विजयासाठी मनसे कार्यकत्रे प्रचारात सक्रिय होत असल्याचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सांगितले.
लातूर मतदारसंघात मनसेने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत जिल्हय़ातील कार्यकर्त्यांची बठक अकमल काद्री यांच्या अध्यक्षतेखाली निलंगा येथे झाली. भाजप उमेदवाराने पािठबा मागितल्याने राज ठाकरे यांच्या तोंडी आदेशावरून जिल्हय़ातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवारास मदत करण्याची भूमिका घेतली. यासाठी कोणतीही अट ठेवली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील जि.प. व पं.स. निवडणुकीत भाजपने मनसेच्या उमेदवाराला पानचिंचोली गटात पािठबा दिला. यातून उतराई होणे, ही पािठबा देण्यामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष नागरगोजे यांनी मनसेतर्फे जिल्हय़ात झालेल्या आंदोलनांची माहिती दिली. डॉ. नरसिंह भिकाणे यांनी प्रास्ताविक, तर इसुफ शेख यांनी सूत्रसंचालन केले.
मनसे भाजपसाठी संकटमोचक
लातूरचा भाजपचा उमेदवार मनमिळाऊ व चांगला आहे. परंतु भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचा उमेदवार अडचणीत आहे. अडचणीतील उमेदवारास सहकार्यासाठी मनसे ‘राखीव दल’ म्हणून धावून जात संकटमोचकाची भूमिका बजावणार आहे, असे सांगून साळुंके यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.