निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आज तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? असं थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी आज निशाणा साधला. तसंच शिंदे गटाला मिंधे गट असं म्हणत टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गद्दार विकले जातात, मात्र समोर असलेलं चैतन्य कधीही विकलं जात नाही

तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी.आमचं ठीक आहे विदाऊट मेक अपशिवाएय नाटक करता येतं. गद्दार विकले जाऊ शकतात, गद्दार विकत घेता येऊ शकतात. मात्र हे जे काही चैतन्य आहे ना? ते कधीही विकत घेता येणार नाही. संजय राऊत गोऱ्या माणसांचे अनुभव सांगत होते. आज मलाही एक माहिती कळली. मला थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. काळजीत होते. मला म्हणाले मी मुद्दाम आलो आहे कारण उद्या मी भाजपात चाललो आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एफबीआयने रेड टाकली, तेव्हा खोकेवाले त्याला बोलले की तू असा कसा? भाजपात ये किंवा मिंधे गटात ये. त्यानंतर नीट झोप लागेल. ज्यांना झोपायचं आहे त्यांनी झोपा. उठूच नका. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
cm eknath shinde hatkanangale lok sabha marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास
jitendra awhad Prakash Ambedkar (1)
“…तर पुढची पिढी माफ करणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना टोला; म्हणाले, “संविधानाविरोधात…”

काही वर्षांपूर्वी कलिना विद्यापीठात कार्यक्रमात होता.त्यावेळी ते मला म्हणाले की तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. त्यांना म्हटलं मग सोबत या, ते सोबत आले पण आता त्या कळपात गेले. काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो. तिथे दुभाषी घेऊन गेलो होतो. तो काळ साधारण काही दिवसांनी तिथे ऑलिम्पिक होणार होतं. त्याला म्हटलं बिजिंगमध्ये जा तिथे चांगले पैसे मिळतील. तर तो म्हणाला बिजिंग मध्ये मी जाणार नाही कारण मला जगायचं आहे. मी विचारलं असं का? तर त्याने मला सांगितलं की तिथे कुणी सरकार विरोधात दोन शब्द बोललं तर तो माणूस गायब होतो. अशीच पकड भारतातलं सरकार हुकूमशाही आणू पाहात आहेत.

वडील चोरणाऱ्या अवलादीने स्वतःचे वडील लक्षात ठेवावे

वडील चोरणारी ही अवलाद आहे. स्वतःचे वडील लक्षात ठेवा म्हणजे झालं नाहीतर स्वतःचे वडील विसरायचे. काल म्हणाले शरद पवार गोड माणूस. आधी म्हणाले की मी मोदी का आदमी. नेताजींच्या मुलींचं वक्तव्य मी ऐकलं. त्या म्हणाल्या नेताजींचा वारसा ढापण्याचा डाव आहे. इथेही तेच तेच चाललं आहे. सरदार पटेल आमचे, बाळासाहेब आमचे, बाबासाहेब आंबेडकर आमचेच. मोदी के आदमी, चेहरा बाळासाहेबांचा का? कारण बाळासाहेबांच्या फोटो शिवाय मतं मिळत नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? महाराष्ट्रात निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांना पर्याय नाही. हे मोदींनाही मान्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबईच्या ठेवींवर केंद्र सरकारचा डल्ला

बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असं मोदी म्हणाले ते भयंकर आहे. FD म्हणजे काय? ते मुंबई महापालिकेचे हजारो कोटी आहेत ते कुणी दिले? तेव्हाचे जे लोकप्रतिनिधी, आयुक्त यांनी जी मेहनत केली त्यामुळे या ठेवी झाल्या आहेत. पण यांचा डाव हाच आहे. गुजरातमध्ये प्रकल्प पळवायचे, फिल्मसिटी पळवायची.जनतेच्या पैशांवर डल्ला मारायचा. आपण जो कोस्टल रोड करत आहोत तो टोलमुक्त असणार आहे. नागरिकांना टोल लागणार नाही. सरकार जे करणार आहे त्यावर टोल लागणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईला भिकेला लावायचं, कंगाल करायचं हा डाव आहे. यांची वाईट नजर मुंबईवर पडली आहे. ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे ती आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही. ही कसली बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेणारी माणसं? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.