अलिबाग- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे दोन अपघात झाले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर भाताण बोगद्या जवळ बसचा टायर पंक्चर झाल्याने, टायर बदलण्याचे काम सुरु होते. बसमधील प्रवासी चालकाला मदत करण्यासाठी खाली उतरला होता. यावेळी मागून आलेल्या पिक अप गाडीने त्याला जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर पिक अप मधील तीन जण गंभीर जखमी झाले. पहाटे चार वाजता ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिक अप चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा अपघात पुणे मार्गिकेवर झाला. गॅस टँकर वाहून नेणाऱ्या टॅकरला ट्रेलरने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. खालापूर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.