भारत जोडो यात्रा केवळ काँग्रेस नेत्यांच्या मुलांना लॉंन्च करण्यासाठी आहे, अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसच्या यात्रेत केवळ मोठ्या नेत्यांच्या मुलांना समोर केले जात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषेद ते बोलत होते.

हेही वाचा – “पवारांच्या घरातच उभी फूट…”, गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका केली होती. “काँग्रेसची भारत जोडो यात्रा बघितली, तर या यात्रेत नेत्यांच्या मुलांना समोर केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. नंदुरबार, भिवंडी, मिरा-भाईंदर, ठाणे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राहुल गांधीसारखे नेते महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे खालचे कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत? याचे आत्मचिंतन काँग्रेसने केले पाहिजे”, असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा – अफजल खानाच्या कबरीशेजारी तिसरी कबर कोणाची? उत्तर देत संभाजी ब्रिगेडचा मोठा दावा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बावनकुळेंच्या या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “चिडखोर आणि अशी वक्तव्य करणाऱ्यांवर काय बोलाव? या भारत जोडो यात्रेत सर्वच जाती-धर्माचे लोक सहभागी होती आहे. या यात्रेमुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी काहाही बोललं तरी फरक पडणार नाही. आम्ही अशा विधानांकडे दुर्लक्ष करतो”, असे ते म्हणाले.