बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात घडला? याबाबत अद्याप संभ्रम आहे. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूतही राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. दोघांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

या प्रकरणामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी यापूर्वी केला होता. यानंतर आता राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. दिशा सालियनवर तू अत्याचार केला. तिची हत्या केली, तुला सोडणार नाही, असं विधान नारायण राणेंनी केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा- Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना नारायण राणे म्हणाले, “सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणार. दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला आहे, तू हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा” असा गंभीर इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. यापूर्वीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केले होते.