शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला. दरम्यान, या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशाराही राणे यांनी ठाकरे गटाला दिला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> “मी दादागिरीला घाबरत नाही, पण नाना पटोलेंनी…”; जाळून टाकण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया

“सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. दादरला घटना घडली म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो. शनिवारी घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलीस चौकशी करतील. गोळीबार झाला असेल तर आवाज तरी येतोच. तसंही शिवसेनेकडे आता तक्रार करण्यापलीकडे उरले नाही. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारीचे मार्केटिंग केली जात आहे,” असे नारायण राणे म्हणाले. तसेच अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इसा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.

हेही वाचा >>> ‘…म्हणूनच त्यांनी लोकांना पैसे दिले,’ एकनाथ शिंदेंची पैठणमधील सभा आणि व्हायरल ऑडिओ क्लीपवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ५० लोक घरापर्यंत आले. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे आगामी काळात समजेल. मात्र शिंदे गटाची ताकद आम्हाला समजली आहे. सध्या जो गोंधळ उडाला, त्याची आम्ही दखल घेत नाही. जेव्हा दखल घेऊ तेव्हा त्यांना चालणे, बोलणे, फिरणे अवघड होईल. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आम्ही काम करू,” असा इशारा राणे यांनी दिला. तसेच राज्यात भाजपा-शिंदे गटाची सत्ता आहे. पोलिसांनीही त्याची खबर घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.