लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारामधून राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे आमनेसामने आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना कायमची सुट्टी मिळेल, कारण त्यांच्याकडे आमदार-खासदार कोणीही राहणार नाही”, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे काय म्हणाले?

“अनेक लोकांना मी भेटत आहे. लोक मला एकच सांगत आहेत की, यावेळी तुम्हाला (नारायण राणे यांना) मतदान करायला मिळणार, हे आमचे नशीब आहे. असे उद्गार लोकांचे मला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे मी खुश आहे. ४ जून रोजी जो निकाल लागेल, त्यामध्ये अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळेल”, असा विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : “…म्हणून आम्ही दोन पावलं मागे घेतली”; बच्चू कडू यांचे गंभीर आरोप

…तर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल

“मी आता दिल्लीत कॅबिनेट मंत्री आहे आणि पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. पण त्यांना (विनायक राऊत यांना) काय मिळणार? या निवडणुकीत आमचे खासदार ४०० पर्यंत जाणार आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, मग दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार? कोकणात पूर येतो, दहा वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, असा कोणता प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवला नाही. त्यामुळे हे प्रश्न आधी सोडवा. अडीच लाख कशाला म्हणतात? उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जेमतेम अकाराशे लोक होते”, अशी टीका नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील. मग सहा राहतील. त्यापैकी किती येतील हे माहिती नाही. पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल, कारण निवडणुकीनंतर आमदार खासदार कोणहीही राहणार नाही”, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.