लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: लक्ष (लेबर रुम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिटिव्ह ) कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल या संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लक्ष अर्थात लेबर रुम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिटिव्ह  कार्यक्रम हा केंद्र शासनाचा आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय यांचे मार्फत संस्थेमधील प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह यांचा दर्जा उंचविण्याचा दृष्टीने आयपीएचएस (इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड) व एनक्यूएएस (नॅशनल कॉलिटी एशुरन्स स्टँडर्ड) मानांकनानुसार मे-२०१८ मध्ये सुरु करण्यात आले.

लक्ष (लेबर रुम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिटिव्ह ) या कार्यक्रमाचा मूळ उद्देश गर्भवती महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणे तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन प्रसुती सुरक्षितपणे करणे तसेच मातामृत्यू व बालमृत्यूंचे प्रमाण कमी करणे  आहे. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमातर्गत संस्थास्तरावर प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया गृहासाठी क्वालिटी सर्कल स्थापन करण्यात आले आहे.  यामध्ये वैद्यकिय अधीक्षक, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भुलतज्ज्ञ, अधी परिसेविका व परिसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. क्वालिटी सर्कल यांचेमार्फत संस्थास्तरीय मुल्यमापन करून आरोग्य संस्थेतील त्रुटी काढण्यात आले. सदर त्रुटींची पुर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय कोचिंग चमुमार्फत मूल्यमापन करण्यात आले. सदर मूल्यमापन अहवालानुसार, ७० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त आरोग्यसंस्थांना राज्यस्तरीय मानांकनाकरीता पाठविण्यात आले.राज्यस्तरीय मानांकनाकरीता चंद्रपूर जिल्ह्याातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या आरोग्यसंस्थाची निवड करण्यात आली.

सदर संस्थेची मानांकनानुसार पडताळणी करणेकरीता केंद्रशासनामार्फत दोन सदस्यीय चमू पाठविण्यात आले. सदर चमुमार्फत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने तसेच मातामृत्यु दर शून्यावर आणल्याने तेथील प्रसुतीगृहाला व शस्त्रक्रियागृहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बाबत केंद्रशासनाकडून २ मार्च २०२० रोजी पत्राद्वारे जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर कळविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने रु.२ लक्ष प्रति वर्ष असे सलग ३ वर्ष प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रति विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सदर संस्थेला भेटी देऊन केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा या सर्व बाबींमुळे सदर संस्थेला मानांकन मिळणे शक्य झाले.राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरीता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, लक्ष कार्यक्रम अधिकारी डॉ. बंडू रामटेके, स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती श्रीरामे, जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पराग जिवतोडे, आयपीएचएस समन्वयक डॉ. यशश्री मुसळे, संस्थास्तरावरील वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. गोवर्धन दूधे, उपजिल्हा रुग्णालय मुल डॉ. सूर्यकांत बाबर तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल येथील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award announced for warora and mul sub district hospitals scj
First published on: 30-06-2020 at 20:15 IST