Video: समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मोर्चा; ‘समीर वानखेडे आगे बढो…’सहीत नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी

“प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” अशी टाका करण्यात आलीय.

NCB Sameer wankhede Support Rally
सांगलीत काढण्यात आला मोर्चा

मुंबईमध्ये २ ऑक्टोबर रोजीच्या कारवाईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. असं असतानाच सांगलीमध्ये आज समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढल्याचं दिसून आलं. यावेळी ‘समीर वानखेडे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, ‘वी सपोर्ट समीर वानखेडे’, ‘ड्रग्ज माफीयांना पाठीशी घालणाऱ्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो,’ अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी असणाऱ्या नितीन चौगुले यांनी संस्थेची बाजू मांडली. “नवाब मलिकांसारखे जबाबदार मंत्री समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यांच्यावर राजकीय आरोप केले तर समजू शकतो पण त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले,” असं चौगुले म्हणाले.

“प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” असं चौगुले यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb sameer wankhede support rally in sangali scsg

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या