जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली आहे. पण संबंधित मुलीने पोलिसांत वेगळाच खुलासा केला आहे. अभ्यासाच्या कारणामुळे आपण घर सोडलं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर आता नवनीत राणांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला असून नवनीत राणाने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “खरं तर, नवनीत राणा यांनी पोलिसांचा अपमान केला आहे, हे वास्तव आहे. कारण पोलिसांमुळेच आपल्याला दिवाळी, दसरा यासारखे सण साजरे करता येतात. नवनीत राणा यांनी यापूर्वीही दहीहंडी उत्सवात माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर माझ्याशी गाठ आहे, अशी पोलिसांना धमकी दिली होती. ज्यांच्या भरवश्यावर आम्ही माणसं जिवंत आहोत, त्यांना नवनीत राणा धमक्या देत आहे.”

“पोलीस पत्नीने जे आरोप केलेत ते खरे आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांनी माफी मागायला काही हरकत नाही. कारण पोलीस आणि शेतकरी असे दोन व्यक्ती असे आहेत, की ज्यांच्यामुळे आपण सुखा-समाधाने जगू शकतो. त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. हा पोलिसांचा अपमान आहे” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

मिटकरी पुढे म्हणाले “गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुखांनी अमरावतीला समरसतेची ओळख दिली. त्याच अमरावती शहरात लव्ह जिहादसारखी खोटी प्रकरणं पुढे आणून तेढ निर्माण केला जात आहे. वास्तविक त्या प्रकरणात काहीही तथ्य नव्हतं, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. ती मुलगी स्वत: समोर आली आहे. मी अभ्यासामुळे घर सोडलं, माझी बदनामी थांबवा, असं ती म्हणाली. अशा समरसता शिकवणाऱ्या शहरामध्ये जेव्हापासून नवनीत राणा खासदार झाल्या आणि रवी राणा आमदार झाले, तेव्हापासून हिंदू-मुस्लीम हा धृवीकरणाचा भाग झाला आहे. याच्या अगोदर विदर्भाची किंवा अमरावतीची अशी ओळख नव्हती.”

हेही वाचा- “तुम्ही काळजी करू नका” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकात पाटलांचा टोला

“अमरावतीकर फार हुशार आहेत. त्यांनी समरसता जपली आहे. मला वाटतं की धर्माच्या नावाखाली हिंदू मुस्लीम दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंदू, मुस्लीम, लव्ह जिहाद अशी प्रकरणं उकरून भाजपाच्या मदतीने कसं निवडून येता येईल? यासाठी हा प्रयत्न आहे, असंही मिटकरी म्हणाले.

हेही वाचा- VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हनुमान चालीसा वादावरून टीका करताना अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, “राणा दाम्पत्याचं हिंदुत्व बेगडं हिंदुत्व आहे. त्यांच्या हिंदुत्वाला सर्व सामान्य हिंदू बळी पडणार नाही, हनुमान चालीसा खिशात घेऊन फिरायचं, हनुमान चालीसाचं वाटप करायचं, यापेक्षा हनुमानाने वाईट प्रवृतीविरोधात बंड केलं होतं, असं मी वाचलंय, ते जनतेसमोर येऊ द्या. हनुमानाप्रमाणे मुलं पहिलवान आणि बलवान करायला पाहिजेत. यासाठी राणा दाम्पत्याचं कार्य काहीच नाही. म्हणून नवनीत ताईंना माझं एकच सांगणं आहे की, ताई हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर चालतो, तुमच्या या हिंदू-मुस्लीम धृवीकरणाला सध्याच्या काळात काडीमात्र किंमत नाही. हे लक्षात असू द्या.”