“आमच्यातले अनेक लोक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, अशी मागणी करत असतात. पण कशाला द्यायचा भारतरत्न? भारतात महात्मा जोतीराव फुले, महात्मा गांधी आणि महात्मा बसवेश्वर असे दोन-तीनच महात्मा आहेत. पण भारतरत्न किती आहेत. महात्मा गांधींना भारतरत्न द्या, असे कुणी नाही म्हणत. कारण ते महात्मा आहेत. तसेच जोतीराव फुलेही महात्मा आहेत. त्यांना भारतरत्न देऊन खाली का आणायचे?”, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. ईलाईट सर्टिफिकेशन्स आणि ईनोव्हेटीव सोलुशन संस्थेच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. यावेळी छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केले.

“नाभिक समाजाने मराठ्यांवर…”, भुजबळांच्या त्या आवाहनावर जरांगे पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

congress rebel candidate vishal patil
शिस्तभंगाची कारवाई करणाऱ्यांनी काँग्रेससाठी योगदान किती तपासावे – विशाल पाटील
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
dr amol kolhe, central government, BJP, mahatma phule , farmer issues
चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात आसूड उगारण्याची वेळ आली – खासदार डॉ. अमोल कोल्हे
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सध्या कितीतरी लोकांना आपण भारतरत्न देत आहोत. मागच्या महिन्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न दिले, ही चांगली गोष्ट आहे. कर्पुरी ठाकूर ओबीसी समाजातून पुढे आले. त्यांनी आयुष्यभर मागासवर्गीयांसाठी काम केले, असे क्वचितच व्यक्ती असतात. असे अनेक भारतरत्न आहेत, ज्यांचे नावही कुणाला माहीत नाही. त्यांच्याबरोबर जोतीराव फुलेंना आणून बसवायचे कारण काय? महात्मा फुले हे महात्मा आहेत. गांधींनीही सांगितले की, फुले हेच खरे महात्मे. तरीही आमचे लोक फुलेंना भारतरत्न मिळावा, म्हणून मागे लागलेले असतात.

“छगन भुजबळ तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार..”, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्या शाळेचे स्मारकरण्यासाठी आम्हाला २३ वर्ष सरकारमध्ये भांडावे लागले. शेवटी न्यायालयात गेल्यानंतर आता प्रश्न सुटला. लवकरच तिथे स्मारक उभे राहिल, तेव्हा माझ्यासहीत आनंद होईल. भिडे वाड्यासमोरच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्या मंदिरासमोर अनेकदा अथर्वशीर्ष पठण केले जाते, असे वर्तमानपत्रात वाचायला मिळते. २० ते २५ हजार महिला अथर्वशीर्ष म्हणणार आहेत, अशी बातमी येते. आमचे त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण त्यापैकी २५ महिला सुद्धा हा विचार करत नाहीत की, आम्ही आज जे अथर्वशीर्ष म्हणत आहोत ते सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच. त्या सावित्रीमाई फुलेंची पहिली शाळा रस्ता ओलांडल्यानंतर समोरच आहे. पण तिथे जाऊन कुणीही डोकं टेकवत नाही, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.

आजची पिढी सोशल मिडीयाचा आहारी गेली असून त्यांच्यापर्यंत महापुरुषांची पुस्तके पोहचविण्याची आवश्यकता आहे, असेही भुजबळ म्हणाले. तसेच समाज सुधारकांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विचार जागर स्पर्धा उपक्रम अतिशय महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.