काही दिवसांपूर्वीच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे करोनावर मात करून रुग्णालयातून परतले. त्यानंतर नियमांप्रमाणे त्यांना पुढील काही दिवस क्वारंटाइनदेखील राहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या कामाला सुरूवात केल्याची माहितीही समोर आली होती. यादरम्यान त्यांनी आपल्या करोना काळातील अनुभव सर्वांना सांगितला. “करोनाचा मानसिक हल्ला होऊ देऊ नका. करोनाचा शरीरातील प्रवेश बाहेर काढता येऊ शकतो. पण मानसिक आरोग्य उत्तम ठेवा,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आणखी वाचा- “करोना झाल्याचं समजताच पंकजा यांचा फोन आला आणि म्हणाल्या…”; धनंजय मुंडेंनी सांगितली आठवण

congress general secretary Sachin Pilot
काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल
Major General Aharon Haliva
इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अहरॉन हलिवांचा राजीनामा, हमास हल्ल्यासह ‘या’ कारणांमुळे सोडलं पद
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

“आईमुळे करोनासोबत लढण्याचं बळ मिळालं. जनतेच्या सदिच्छांमुळे मी लवकर या आजारातून बरा झालो. यादरम्यान पंकजा मुंडे यांचाही फोन आला याचा मला आनंद झाला. जितेद्र आव्हाड यांनीदेखील मला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी फोन केला होता. तसंच काय काळजी घ्यायची ते पण सांगितलं होतं. त्यांचीही यादरम्यान खुप मदत झाली,” असं मुंडे यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपला अनुभव सर्वांसमोर मांडला.

आणखी वाचा- “…तो अति आत्मविश्वास नडला”, करोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

यावेळी त्यांनी रुग्णालयातील सर्व कोविड योद्ध्यांचेही आभार मानले. “ते ज्या प्रकारे सर्व रुग्णांना सेवा देत आहेत ते शब्दांमध्ये सांगणं कठिण आहे. सुरूवातीच्या काळात करोनामुळे माणुसकी मेली असा माझा समज झाला होता. परंतु ज्यावेळी मी रुग्णालयात होतो तेव्हा योद्धे ज्याप्रकारे रुग्णांची सेवा करत होते त्यावरून मला पुन्हा माणुसकी दिसली. जेव्हा करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं तेव्हा पहिल्यांदा आईचा चेहरा मला आठवला. या कालावधीत कुटुंबीयांनीदेखील धीरानं परिस्थिती हाताळली,” असंही ते म्हणाले. “या दरम्यान आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हलही योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी मी रुग्णालयात असतानाही तीन चार तास प्रणायम करत होतो. औषधोपचारांसोबतच प्राणायममुळे मला या आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली,” असंही मुंडे म्हणाले.