बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयानंतर व्यक्त केली.

आ. पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले. जनतेला भ्रष्टाचार आणि जातिधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी कर्नाटक प्रदेश  काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन करतो.