राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. कोकणात भाजपानं विजयाचा नारळही फोडला असून ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील बदलत्या समीकरणांची विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेंनी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक विधान केलं आहे. “सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. भाजपात पक्षप्रवेश करण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याचा आरोप, मविआ उमेदवार शुभांगी पाटील स्पष्टच म्हणाल्या, “बलाढ्य शक्तींनी…”

या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत, अशा आशयाची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय हा भाजपाचा विजय असेल का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “तो भाजपाच्या बाजुने निकाल नाहीये. भाजपाला त्याठिकाणी उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीने धुळे जिल्ह्यातील महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली.”