सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर आता गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अतिशय माफक दरात आयात केले. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे कुठेही उल्लंघन झाला नाही. असे असताना सुद्धा आता कच्च्या तेलाची वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय?,” असा सवाल केला आहे.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती गॅस सिलेंडरही महागला; मोजावे लागणार इतके रुपये

“ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत एकदम न्यूनतम होती तेव्हादेखील मोदी सरकारने स्वयंपाक गॅसचे दर कमी केले नाही आणि आता वाढीव किंमत आहे असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे हे योग्य नाही,” असेही महेश तपासे म्हणाले.

Petrol-Diesel Price Today: १३७ दिवसांनंतर देशात इंधनदरवाढ; जाणून घ्या कितीने महागलं पेट्रोल आणि डिझेल

“भारतात महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठलेला आहे अशा परिस्थितीत घरगुती गॅस दरवाढीमुळे सामान्यांच्या डोक्यावर अधिक आर्थिक बोजा पडेल,” अशी शंकाही महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे. “एकेकाळी इंधन दरवाढीच्या विरोधात आकांडतांडव करणारे भाजपचे नेते आता गप्प का आहेतअसा प्रश्न देशातील जनता विचारत,” असल्याचं महेश तपासे म्हणाले.