राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी नागपुरात पत्रकारांनी बोलताना यावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजेंनी फेटाळला शिवसेनेचा प्रस्ताव?

शिवसेनेकडून संभाजीराजेंना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. संभाजीराजे आज दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. पण दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीआधीच संभाजीराजे कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशासाठी दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.

संभाजीराजेंनी फेटाळला शिवसेनेचा प्रस्ताव? निमंत्रण फेटाळत कोल्हापूरला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

शिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजेंनी काय प्रस्ताव दिला?

राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.

शिवसेनेत प्रवेश करण्यास संभाजीराजे अनुत्सुक ; महाविकास आघाडीने पाठिंबा देण्याची मागणी

राजेश टोपेंची प्रतिक्रिया

संभाजीराजेंवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संभाजीराजेंबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. पूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाचे जवळचे सहकारी होते. आम्ही त्यांना लोकसभेची उमेदवारीदेखील दिली आहे. शरद पवारांशी, आमच्याशी सर्वांशी त्यांचे संबंध प्रेमाचे, आपुलकीचे आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील स्पष्ट निर्णय घेतील”

संभाजीराजेंपुढे आव्हान –

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rajesh tope sambhajiraje chhatrapati rajya sabha shivsena sgy
First published on: 23-05-2022 at 15:26 IST