महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवारांबरोबरच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर नकला करत टीका केली. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधलाय. शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही उत्तर देण्यात आलं आहे. मात्र आता राष्ट्रवादीने थेट राज ठाकरे यांच्या दिनक्रमावरुन त्यांना टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. अजित पवार यांनी काल ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये सकाळीच जाऊन उपचार घेत असणाऱ्या धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचा व्हिडीओ पोस्ट करत अजित पवार हे सकाळपासून कार्यरत असतात असं म्हटलंय.

नक्की वाचा >> ‘रिंकिया के पापा’ गाण्याने स्वागत’, ‘क्या नेता बनेगा रे तुम लोग’ ते ‘महाराष्ट्र धर्म सोडला का?’; ठाण्यातील सभेआधीच राज ठाकरे ट्रोल

“महाराष्ट्राच्या विकासासाठी सकाळी सहा वाजल्यापासून कार्यरत असणाऱ्या दादांवर (अजित पवारांवर) १२ वाजता उठणाऱ्याने टीका केली म्हणून दादांचा विकास कामांचा धडाका कमी होणार नाही,” असा टोला वरपेंनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, “दादांची नक्कल करायची असेल तर जरूर पण त्यांच्या धडाकेबाज विकास कामांची,” असंही वरपे म्हणालेत.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे अजित पवार आणि सुप्रियांबद्दल काय म्हणालेले?
सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली़  अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही़ आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोलाही त्यांनी लगावला.