राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी काही गंभार आरोप केले. ही पत्रकार परिषद संपल्यावर यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेचा मित्र पत्र असणाऱ्या काँग्रेसकडून प्रतिक्रिया आल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मलिक यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षच काय २५ वर्षे चालणार असल्याचंही बोलून दाखवलं.

नवाब मलिक म्हणाले की, “आज ज्या प्रकारे संजय राऊत यांनी मागील सरकारमध्ये आयटी विभागात काय घोटाळे झालेले आहेत, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. याचबरोबर किरीट सोमय्या यांच्या भ्रष्ट्रचार प्रकरणांचा उल्लेखही केलेला आहे आणि बरेच काही विषय त्यांनी समोर आणले आहेत. मला वाटतं निश्चितपणे हे विषय ते आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवणार आहेत. या संदर्भात अधिक चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी स्वत: माहिती दिलेली आहे. मला वाटतं ज्या पद्धतीने हरियाणा कनेक्शन सगळं त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे आम्ही अगोदरपासूनच बोलत होतो की, सर्वात जास्त घोटाळा कुठे झाला असेल तर इनकम टॅक्स विभागात आहे. आता त्यांनी सुरुवात केलेली आहे मला वाटतं आणखी पुढे पुढे ते सगळे विषय, कागदपत्र ते लोकासमोर ठेवतील. ”

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

तसेच, “तक्रारींची दखल जर ईडी घेत नसेल मग आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील तक्रार होऊ शकते. आता पुढे कसं काय होणार आहे, कागदपत्र त्यांनी अजून कोणासमोर ठेवलेले नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही सुरूवात करतोय, हळूहळू सर्व विषय समोर आणू मला वाटतं की पुढील पत्रकार परिषदेत ते कागदपत्रं लोकासमोर ठेवतील. ” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Sanjay Raut Press Conference Live: आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! – अमृता फडणवीस

याचबरोबर, “या देशात तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडणं, आमदार फोडणं, आमदार खरेदी करणं हे सगळं उघड झालेलं आहे. काही लोक बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात गेले होते, त्यानंतर ते पुन्हा परत आले. त्यांनी भाजपमधील काय परिस्थिती आहे ती सगळी समोर मांडली. या राज्यात देखील यंत्रणेचा दुरुपयोग होतोय हे स्पष्ट आहे. परंतु जास्त दिवस यंत्रणांचा गैरवपार चालू शकणार नाही. महाराष्ट्रात त्यांनी नाव घेऊन कोणत्या नेत्याला कोण त्रास देतय, कोणती यंत्रणा त्रास देतेय ही माहिती लोकासमोर ठेवलेली आहे. मला वाटतंय जबाबदारीपूर्वक त्यांनी हे सगळे आरोप लावलेले आहेत. लवकरच ते लोकासमोर कागदपत्र मांडतील. ” अस देखील नवाब मलिक यांनी या वेळी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, “थेट नेत्यांकडे न जाता त्यांच्या जवळच्या लोकाना बोलावणे, त्यांच्या घरातील लोकाचे बँक खाती काढणे हे का नवीन नाही. कारण, बऱ्याच जणांची अशा पद्धतीने ते काढत आहेत. त्यांना असं वाटतं की कुठेतरी ही सगळी कारवाई झाली की हे सगळे नेते घाबरतील. पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही, संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. बऱ्याच नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु तिन्ही पक्षातील कोणताही नेता किंवा कोणताही पक्ष घाबरणार नाही. किती त्यांनी प्रयत्न केला तरी ते सरकार पाडू शकणार नाहीत. पाच वर्षच काय २५ वर्षे हे सरकार चालणार. ” असा विश्वास देखील यावेळी नवाब मलिक यांनी व्यक्त केला.