सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी तयार असलेले अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प ताबडतोब बसवा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व शिवभक्तांच्या वतीने करण्यात आली आहे. हे शिल्प तातडीने न बसवल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या वेळी संघटनेकडून देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही २३ वर्षे लढा देतोय. या लढ्यातील शेवटची मागणी अफजल खान वधाच्या जागेसमोर अफजल खान वधाचे शिवप्रतापाचा शिल्प बसवा, या मागणीनुसार सरकारने शिल्पाच्या निविदा काढून अफजलखान वधाचे शिल्प बनवून तयार झालेले आहे. आचारसंहिता व पावसाळ्याचे कारण सांगून शिल्प बसवले जात नाही. वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा टाळाटाळ केली जात आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलन व शिवभक्तांच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सातारा येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे. यावेळी मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरविंद येतनाळे, अरुण वाघमोडे, प्रेम देसाई, सुजित पाटील, अनिकेत आंबरुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता, पावसाळ्याचे कारण
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही २३ वर्षे लढा देतोय. या लढ्यातील शेवटची मागणी अफजल खान वधाच्या जागेसमोर अफजल खान वधाचे शिवप्रतापाचा शिल्प बसवा, या मागणीनुसार सरकारने शिल्पाच्या निविदा काढून अफजलखान वधाचे शिल्प बनवून तयार झालेले आहे. आचारसंहिता व पावसाळ्याचे कारण सांगून शिल्प बसवले जात नाही अशी तक्रार शिंदे यांनी केली. वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा टाळाटाळ केली जात आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलन व शिवभक्तांच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
