scorecardresearch

‘जोडे मारो’ आंदोलकांवर कारवाई नाहीच; विरोधी पक्षांचा सभात्याग, अजित पवार म्हणाले, “अध्यक्षांचा कल…”

विधानसभेच्या आवारात राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई न झाल्याने आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातून सभात्याग केला.

Ajit Pawar (3)
'जोडे मारो' आंदोलन करणाऱ्या आमदारांवर कारवाई झालेली नाही.

राज्याच्या विधानसभा परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी आंदोलन केलं. या आंदोलकांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. परंतु आज विधासभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातून सभात्याग केला.

सभात्यागानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं की, “विधानसभेच्या कामकाजात मागील दोन दिवस आम्ही विरोधी पक्ष महाविकास आघाडी म्हणून सहभागी झालो. परंतु दोन दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या परिसरात जी घटना घडली, एका राष्ट्रीय नेत्याच्या फोटोला जोडे मारण्याचा प्रकार घडला, तो चुकीचा होता. सर्वांची राजकीय मतं वेगळी असू शकतात. पण आपल्या राज्याची एक परंपरा आहे, संस्कृती आहे जी आपण जपली पाहिजे. असं असताना विधीमंडळाच्या परिसरात जेथे यशवंतराव चव्हाणांपासून अनेक दिग्गज नेत्यांचे, ज्यांनी आपल्या राज्याचं नेतृत्व केलं त्या नेत्यांचे पुतळे ज्या परिसरात आहेत तिथे हा जोडे मारण्याचा प्रकार झाला. आम्ही त्याचा निषेध केला.”

अजित पवार यांनी सांगितलं की, आम्ही सर्व गटनेते, विरोधी पक्षनेते मिळून विधानसभा अध्यक्षाकंडे गेलो. आगामी काळात असं काही घडू नये यासाठी संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अशी भूमिका आम्ही घेतली. विधानसभा अध्यक्षांनी ती ऐकून घेतली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यावर योग्य ती पावलं उचलू असं अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं. काल आम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना भेटलो. त्यावेळी पण आम्ही हेच सांगितलं.

हे ही वाचा >> राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल, भारतीय वंशांचे खासदार म्हणाले, “हा गांधीवादी…”

जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी : अजित पवार

विरोधी पंक्षनेते म्हणाले की, सभागृहात जे काही घडलं आणि राष्ट्रीय नेत्याबद्दल कोणी अपमानास्पद बोललं त्यांच्यावरही कारवाई करा आणि ज्यांनी जोडे मारो आंदोलन केलं त्यांच्यावरही कारवाई करावी अशी भूमिका आम्ही घेतली. दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई व्हावी असं आम्ही म्हटलं होतं. जेणेकरून अशा विधानसभा सदस्यांवर अंकूश बसेल. परंतु आज विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की, आता शेवटी काहीतरी याबद्दल सांगायचं, परंतु हे आम्हाला मान्य नाही. ते आत्ताच सांगितलं पाहिजे, सबंधिताना निलंबित केलं पाहिजे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:20 IST

संबंधित बातम्या