सातारा: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पंढरपूर ते आळंदी असा परतीचा प्रवास आज निरास्नानाला पोहोचला माऊलींचे निरास्नान अगदी व्यवस्थितपणे पार पडले परंपरेनुसार निरास्नान झाल्यानंतर विणेक-यांना पादुकांचे दर्शन दिले जाते . सर्वप्रथम रथाच्या पुढील विणेकर्‍यांना आणि नंतर रथाला वेढा मारून मागील विणेकऱ्यांना दर्शन प्राप्त होते . यामध्ये थोडा विलंब झाला आणि काही अपोशक आणि वारकऱ्यांचे स्वघोषित नेतृत्व करणारे नेते यांनी या विलंबाचा फायदा घेत परंपरा मोडीत काढण्याचा सूर ओरडणे सुरू केले. परंतु सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झाली नाही असा स्पष्ट खुलासा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी केला आहे.

योगी निरंजननाथ म्हणाले , माऊलींच्या परतीच्या सोहळ्यामध्ये सर्व दिंड्यांचे प्रतिनिधी म्हणून विणेकरी पायी चालतात आणि यावेळी सर्व परंपरा परिपूर्णपणे माहीत असतात . आजकाल वारीमध्ये काही वारकऱ्यांचे नेतृत्व करणारे स्वघोषित वारकरी महाराज हे सुद्धा घुसखोरी करताना दिसतात आणि त्यांच्याच करवी हे वाद निर्माण करून परंपरादिष्टित वारकऱ्यांना यामुळे त्रास होतो . इसवी सन 1832 पासून श्री गुरु हैबतराव बाबा महाराज यांनी या पालखी सोहळ्याला विशिष्ट अशी परंपरा घालुन दिलेली आहे . त्यामध्ये आज तागायत कुठलाही बदल कोणीही केलेला नाही . त्यामुळे नीरा स्नानानंतर कुठलीही परंपरा खंडित झालेली नाही . असा प्रसंग भविष्यात देखील घडू शकत नाही कारण हा पालखी सोहळा परंपरेचा पाईक आहे . थोड्यावेळ माऊलींचा रथ थांबवला गेला . वारक-यांतील संवादामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं काम काही अराजक तत्त्वांनी केले . परंतु एकंदरीत तीस मिनिटांमध्ये सगळं विचारून आणि व्यवस्थितपणे होऊन सर्व विणेकरी माऊलींच्या रथासोबत निरा मुक्कामी आले आणि सर्वांनी एकत्रितपणे भोजन आणि विश्रांती घेतली.

हेही वाचा : Balasaheb Thackeray : २७ हजार हिऱ्यांनी मढवलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट पाहिलंत का?, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं खास गिफ्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या श्री माऊलींचा पालखी सोहळा हा वाल्हे नगरीमध्ये आहे आणि इथे देखील सर्व विणेकरी सर्व वारकरी अगदी आनंदाने एकत्रितपणे समाज आरती मध्ये सम्मिलित झालेले होते. पुनश्च एकदा सांगणे आवश्यक ही कुठलीही परंपरा ही बाधित झालेली नाही सध्या वारकरी संप्रदायात वारीच्या वाटेवर जे काही राजकत्व स्वतःची राजकीय अथवा नेतृत्वाची विचित्रवासना घेऊन वारकऱ्यांमध्येच मिसळून परंपरांना नियमांना डावलण्याचा प्रयत्न करतात . त्याकरवी समाजाला सुद्धा भडकवतात अशा व्यक्तींवर कुठेतरी नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे . आजचा हा प्रसंग अशाच काही तत्त्वांच्या विचित्र वागणुकीमुळे निर्माण झाला. हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे त्याला स्वयंशिस्त आणि परंपरेची जोड आहे. ही परंपरा अखंडित आणि अबाधित राहण्यासाठी या सोहळ्यातील प्रत्येक घटक हा तितकाच जबाबदारपणे वागतो. परंतु कुठेतरी संवादामध्ये अपवाद निर्माण झाला आणि त्याचा फायदा काही अराजक तत्त्वांनी घेऊन व्यत्यय आणण्याचा वृथा प्रयत्न केला. तरीपण संतांची कृपा आणि परंपरेची जोपासना या दोन्ही गोष्टींनी यावर तात्काळ सुखरूपणे सुसंवाद पूर्ववत होऊन पालखी सोहळा सुखरूप पणे मार्गस्थ झाला सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी सांगितले .