सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरून त्यांनी टीका केली. सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने काल (२३ एप्रिल) कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर असताना कोपर्डी हवेली जिल्हापरिषद गट, मसूर जिल्हा परिषद गट, ओगलेवाडी पंचायत समिती गण, हजारमाची पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा करवडी येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार गट यशवंतराव चव्हाणांचा विचार मांडतात. पण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांना एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, असं उदयनराजे म्हणाले. तसंच, त्यांच्याबरोबर असणारे सर्व भ्रष्टाचारी असतात असंच म्हणावं लागेल, अशीही टीका त्यांनी केली.

हेही वाचा >> साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल

भाजपच्या बाराव्या यादीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहीशी उशिरा पण, उदयनराजेंच्या प्रचाराने गती घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर, उदयनराजेंच्या प्रचारार्थ कराड येथे येत्या ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेत तोफ धडाडणार असल्याने भाजपसह महायुतीत चैतन्य दिसू लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार (दि १९ एप्रिल) रोजी १६ उमेदवारी अर्ज तर एकूण ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ३३ उमेदवार रिंगणात असले तरीही त्यांची खरी लढत शशिकांत शिंदे यांच्याबरोबर असणार आहे.