scorecardresearch

Premium

“आमच्या पाठीमागे फक्त अन् फक्त…”, ‘त्या’ विधानावरून जरांगे-पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी जरांगे-पाटलांबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे.

manoj jarange patil raj thackeray
राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या शंकेला मनोज जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट मनोज जरांगे-पाटील यांना भेटल्यावरच सांगितलं होती. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा, असं आव्हान जरांगे-पाटलांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट जरांगे-पाटलांना भेटल्यावर सांगितली होती. मी आताही वेगळं काही सांगत नाही. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल. पण, आरक्षणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील कायदा-सुव्यवस्था भंग करायची कुणी ठरवली का? निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही,” अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली होती.

Maratha reservation
मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापुरात अमदारांच्या घरांसमोर आक्रोश
pune police, Chadchan gang, caught,karnataka, pistols, cartridges, gangster,
पुणे : कर्नाटकातील चडचंण टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांना पकडले; तीन पिस्तुल, २५ काडतुसे जप्त
chitra wagh reply to ubt leader sushma andhare
“विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”
gautam gambhir arvind kejriwal PTI
“भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव”, केजरीवालांच्या वक्तव्यावर गौतम गंभीरचा टोला, म्हणाला…

हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती-जातींमधला द्वेष वाढला, असंच होत राहिलं तर…”; राज ठाकरेंचा आरोप

“मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही”

यावर जरांगे-पाटील म्हणाले, “आमच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढावं आणि सांगावं. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा. यापाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा समाजातील मुलांचं कल्याण होत असल्यावर खोटे आरोप केले जातात. मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवणार आहे.”

हेही वाचा : “मराठ्यांचा ७० वर्षे घात झाला, षडयंत्र रचून…”, ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

“लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे”

“या सगळ्यांमुळे मूळ मुद्दे भरकटवले जात आहेत. अन्यही महत्वाचे विषय आहेत. पण, वेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे. ज्या गोष्टींमुळे जनता त्रस्त आहेत, ते विषय नागरिकांच्या डोक्यात येऊन नये म्हणून असा प्रयत्न केला जातोय. लोकांचं लक्ष विचलित केलं जातंय,” असेही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Only maratha community my backbone manoj jarange patil reply raj thackeray ssa

First published on: 16-11-2023 at 16:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×