भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे मौन बाळगणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची डोकी भरकटली”; तंत्र-मंत्र, करणीचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन सेनेचा टोला

“गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात अप्रिय घटना घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्यात आला आहे. राजकारणात अशा प्रकारे महापुरुषांचा वापर करणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवर होणारे अत्याचार अशा गंभीर घटनांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आम्ही मौनव्रत पाळणार आहोत”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तसेच हे मौन अर्धा तासाचं असेल असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”, ‘तो’ किस्सा सांगत आव्हाडांचं मोठं विधान!

यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून अनेकांनी टीका केली. मात्र, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माफीदेखील मागितली. त्यामुळे माफी मागितल्यानंतर ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. एखाद्या नेत्याने महामानवाविषयी बोलू नये, असं माझं मत आहे. मात्र, कोणी बोलल्यानंतर माफी मागत असेल त्याला माफ करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. पण तरीही अशा प्रकारे कोणी शाईफेक करत असेल तर हे गंभीर आहे”, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “संजय राऊतांना ‘चमचा’ निशाणी द्यावी”; ठाकरे गटाच्या खासदाराची उपरोधिक टोलेबाजी, म्हणाले, “ती उबाठा सेना…”

दरम्यान, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. तसेच या निमित्ताने गोपीनाथ गडावर किर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबूक आणि झुमच्या माध्यमातून होणार असून याद्वारे राज्यभरातील नागरिक या कार्यक्रात सहभागी होतील, अशी माहिती पंकडा मुंडे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde will keep silence for half an hour against controversial statement on shivaji maharaj spb
First published on: 12-12-2022 at 08:53 IST