सांगली : तेलंगणामधून देवदर्शनासाठी निघाले असताना विश्रांतीसाठी पेट्रोलपंपावर थांबले असताना मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी हत्याराचा धाक दाखवत सुमारे १ लाख ६९ हजाराचा ऐवज लुटल्याची घटना मध्यरात्री मिरजेजवळ कळंबी येथे घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून चालकालाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे.

सोलापुरात अतिदुर्मीळ माळढोक दर्शनाने पर्यावरणप्रेमी सुखावले ; कृत्रिम प्रजनन केंद्र कागदावरच

चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी (वय ४२, रा. हनुमान नगर, कम्युनिटी हॉल अल्विन कॉलनी, मेडचल जि. मेडचल,तेलंगणा) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दरोड्याची तक्रार दिली आहे. ते हैद्राबादहून क्रूझर जीपने तुळजापूर, पंढरपूर येथे देवदर्शन घेउन रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून कोल्हापूरमधील अंबाबाई दर्शनासाठी निघाले होते. कू्रझर मोटार मिरजेपासून सात किलोमीटर अंतरावरील सह्याद्री पेट्रोल पंपावर मध्यरात्र झाल्याने विश्रांतीसाठी थांबविण्यात आली. मोटारीमध्ये फिर्यादी बावीकडी यांच्यासह दोन महिला, दोन लहान मुली, एक तरूणी व चालक असे प्रवासी होते. मध्यरात्री एक वाजणेच्या सुमारास मोटारीवर आवाज झाल्याने जागे होउन पाहिले असता सात ते आठ जण धारदार हत्यारासह दार उघडण्यास  सांगत असल्याचे दिसले.मोटारीचे दार उघडल्यानंतर चाकूचा धाक दाखवून सोन्याचे गंठण, कर्णफुले असा चार तोळे सोन्याचे  दागिने आणि १५ हजाराची रोकड त्यांनी लुटली. यावेळी पती, पत्नी व चालकास मारहाणही केली. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये  सुमारे १ लाख ६९ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.