Narendra Modi Maharashtra Visit Live, 19 January 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे रणशिंगही फुकले.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
nashik lok sabha marathi news, nashik loksabha latest news in marathi
लाभार्थी संपर्क अभियानाद्वारे भाजपची घरोघरी प्रचाराची रणनीती, विरोधकांचे आक्षेप खोडण्याची धडपड
Live Updates

Maharashtra News, Narendra Modi Mumbai  : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडेकोट सुरक्षा

23:18 (IST) 19 Jan 2023
पुणे : ‘कसब्या’साठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा, शैलेश टिळक यांची प्रथमच जाहीर भूमिका

पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा...

22:59 (IST) 19 Jan 2023
पुणे : महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर, कराडजवळ वाहतूक कोंडी

कराड : पुणे – बंगळुरू महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारासमोरील आणि मलकापूरच्या हद्दीतील पादचारी उड्डाणपुलास आकाराने उंच स्वरुपाचा कंटेनर जोराने धडकून अडकल्याने काही काळ वाहतूक खोळांबली होती. ही घटना आज गुरुवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर वाचा...

22:45 (IST) 19 Jan 2023
नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

नाशिक – देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांच्या अंगावर धाऊन गेले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

22:01 (IST) 19 Jan 2023
एमपीएससीच्या चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत.

सविस्तर वाचा...

21:37 (IST) 19 Jan 2023
प्रियांका चोप्रा आणि माजी सचिव प्रकाश जाजू यांच्यातील वादावर पडदा, जाजू यांच्याविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिचे माजी सचिव प्रकाश जाजू यांच्याविरुद्ध २००८ मध्ये धमकावणे आणि विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. वाद परस्पर सामंजस्याने सोडवल्याचे आणि प्रकरण पुढे नेण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने जाजू यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.

सविस्तर वाचा...

21:22 (IST) 19 Jan 2023
मुंबई : मुलुंड आणि ठाण्यातील नागरिकांना आजपासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा, पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन

मुंबई : मुलुंड आणि ठाण्यातील काही भागांतील नागरिकांना २० जानेवारीपासून पुढचे काही दिवस शुद्धीकरण प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. या जलबोगद्याची दुरुस्ती शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

19:57 (IST) 19 Jan 2023
खऱ्या इतिहासाची मोडतोड ही सध्या ‘फॅशन’, जेजुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चात शिवेंद्रराजे भोसले यांचे वक्तव्य

जेजुरी : कोणी उठायचे आणि आपला इतिहास कसाही तोडायचा-मोडायचा, एखादे वक्तव्य करायचे, सध्या ही ‘फॅशन’ झाली आहे. पण, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. खरा इतिहास बाजूला ठेवल्यामुळे नंतर त्याचा उद्रेक होतो. जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत हसावे की डोके फोडून घ्यावे हे समजेना, केवळ चर्चेत राहण्यासाठीच अशी वक्तव्य केली जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे हिंदू बांधवांमध्ये भीती निर्माण होऊ लागल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. देव-देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

सविस्तर वाचा...

19:27 (IST) 19 Jan 2023
ठाणे : डोंबिवलीत एकाच रात्री दोन सराफा दुकानांत चोरी, लाखो रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास

डोंबिवली – येथील पश्चिम भागातील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी पहाटे चोरट्यांनी दोन सराफा दुकानांत चोरी करून लाखो रुपयांचा सोने, चांदीचा ऐवज लुटून नेला. पळून जाताना चोरट्यांनी आपला थांगपत्ता लागू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर नेले.

सविस्तर वाचा...

19:06 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंदवली मेट्रो स्थानकात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे लोकार्पण केलं असून ते आता गुंदवली मेट्रो स्थानकात दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ते मेट्रोने प्रवासही करणार आहेत.

18:40 (IST) 19 Jan 2023
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या पुत्राची निवडणूक रिंगणात उडी

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी उमेदवारी दाखल करून राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला आहे. आ. पाटील यांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८५ मध्ये कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊनच केली होती.

सविस्तर वाचा...

18:33 (IST) 19 Jan 2023
....तर मुंबईचा विकास गतीने होईल - पंतप्रधान मोदी

मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

18:27 (IST) 19 Jan 2023
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला- पंतप्रधान मोदी

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

18:22 (IST) 19 Jan 2023
पुणे : मूल होण्यासाठी पत्नीला पाजली स्मशानातील राख, भरभराटीसाठी मृतांच्या हाडाची पावडर

पुणे : मूलबाळ होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच, पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडाची पावडर खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 19 Jan 2023
स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे - पंतप्रधान मोदी

आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटीं रुपायांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वी देशात फक्त गरिबीवर चर्चा करत वेळ काढला जायचा, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे. भारत आपल्या सामर्थ्यांच्या योग्य वापर करत आहे. भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे. असेही ते म्हणाले.

18:05 (IST) 19 Jan 2023
पणे : वायदेबंदी विरोधात सेबीसमोरील आंदोलनासाठी शेतकरी संघटनांची एकजूट, २३ जानेवारी रोजी मुंबईत धरणे

पुणेः स्वतंत्र भारत पार्टीने जाहीर केलेल्या सेबीच्या कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतीमालावर घातलेल्या वायदेबंदीला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी २३ जानेवारी रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

17:56 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांच लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.

17:47 (IST) 19 Jan 2023
डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान बंद होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचं दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

17:44 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं - मुख्यमंत्री

आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा आहे. राज्यात आज सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

17:38 (IST) 19 Jan 2023
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता - मुख्यमंत्री

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. अनेकांनी इच्छा होती, या कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये, मात्र, नियतीपुढे कोणाचंही चालत नाही, असेही ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=NpHn6Hie_mI

17:34 (IST) 19 Jan 2023
राष्ट्रवादीचे बहुमत तरीही अडचणीतील ‘महानंद’ची सूत्रे विखेंच्या हाती

पुणे : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजे, महानंदची पंचवार्षिक निवडणूक अपवाद वगळता बिनविरोधच झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असतानाही सरकारी पातळीवरून मदत व्हावी आणि महानंद अडचणीतून बाहरे यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महानंदची सर्व सूत्रे दिली होती. त्यामुळे, महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लावता आली.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 19 Jan 2023
काही लोकांच्या बेईमानीमुळे राज्यातील डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला - देवेंद्र फडणवीस

काही लोकांच्या बेईमानीमुळे राज्यातील डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

17:17 (IST) 19 Jan 2023
PM Modi Bandra-Kurla Complex : काळ्या पोशाखातील बाऊन्सरना प्रवेश मनाई

वांद्रे कुर्ला संकुलातील सभास्थळी मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभास्थळी सामान्याना सोडण्यात येणारे प्रवेशद्वार, अति महत्त्वाच्या व्यती आणि पत्रकारांच्या प्रवेशद्वाराबरोबरच ठिकठिकाणी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.

सविस्तर वाचा

17:15 (IST) 19 Jan 2023
राज्याला मिळणार ६३ नवीन न्यायाधीश, प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत सुबोध भैसारे राज्यातून प्रथम

चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात शिक्षण घेतलेला सुबोध अशोक भैसारे (२६) याने राज्यात प्रथम क्रमांक, तर रेवती प्रशांत बागडे (२४) हिने मुलींमधून प्रथम, तर राज्यातून द्वितीय स्थान मिळवले आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 19 Jan 2023
मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतून १४२ गाड्यांचा ताफा रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण करण्यात येणर आहे. तसेच ते जनतेला संबोधित करणार असल्याने मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांचे आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही ताफा यात आहे. बाहेर गावातून येणाऱ्या अतिरिक्त बसमूळे सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती.

सविस्तर बातमी

16:51 (IST) 19 Jan 2023
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी थोड्याच बिकेसी मैदानाकडे रवाना होणार आहेत.

16:37 (IST) 19 Jan 2023
PM Narendra Modi Mumbai Visit : ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचं स्वागत

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ढोल-ताशे आणि लेझीम पथक बीकेसी मैदानावर दाखल झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचं स्वागत केले जाणार आहे.

16:31 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचा वाहतुकीवर परिणाम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील अनेक मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. त्यामुळे, पर्यायी मार्गांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सविस्तर वाचा..

16:31 (IST) 19 Jan 2023
थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचं मुंबईत आगमन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री विमानळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री विमानळावर दाखल झाले आहे.

16:18 (IST) 19 Jan 2023
Narendra Modi Mumbai visit : पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी जाहीर

वांद्रे-कुर्ला संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे गुरुवारी या परिसरातील खासगी कार्यालयांना दुपारी १२ नंतर सुट्टी देण्यात आली होती. परिणामी, वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील कार्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ नंतर घरची वाट धरली.

सविस्तर वाचा

16:15 (IST) 19 Jan 2023
ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी, मग ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क साधा

नागपूर : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या देशामध्ये सुमारे २३ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागवण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाईन (क्रमांक १४५६७) सुरू केली आहे. ती सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत आहे.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 19 Jan 2023
हिंदी राष्ट्रभाषा नाही, राज्य सरकारकडून दुरुस्ती; हिंदी साहित्य अकादमी पुनर्रचनेचा सुधारित अध्यादेश काढला

पुणे : हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्याच्या अध्यादेशातील चुकीवर टीका झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने दुरुस्ती केली आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुनर्रचनेचा सुधारित शासकीय अध्यादेश काढून सांस्कृतिक विभागाने चूक सुधारली आहे.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 19 Jan 2023
“ठाण्याच्या महापौर बंगल्यात…” शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बाळासाहेबांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत वर्षभरापुर्वी संपुष्टात आली आहे. तरीही पालिकेतील पदाधिकारी आणि गटनेत्यांची कार्यालये सुरुच होती. याठिकाणी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा वावर सुरुच होता. याचमुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी पालिका प्रशासनावर टिका करत ही कार्यायले बंद करण्याची मागणी केली होती.

सविस्तर वाचा

15:44 (IST) 19 Jan 2023
नागूपर : अविवाहित असल्याचे सांगून युवतीशी विवाह, जीम ट्रेनरवर बलात्काराचा गुन्हा

नागपूर : जीममध्ये कसरतीसाठी आलेल्या तरुणीला जीम ट्रेनर युवकाने अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी प्रेमविवाह केला. महिन्याभरातच घरी त्याची पत्नी आणि मुलगा आल्याने युवकाचे बिंग फुटले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने जाब विचारताच युवकाने तिच्याशी शारीरिक संबंधाचे मोबाईलने काढलेले फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

सविस्तर वाचा..

15:36 (IST) 19 Jan 2023
जितेंद्र आव्हाडांविरोधात ‘मुंब्रा विकास आघाडी’, मुंब्य्रातील गडाला सुरुंग लावण्याची शिंदे गटाची रणनिती

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसागणिक वाढू लागला असून, आव्हाड यांना धक्का देण्यासाठी त्यांच्या मुंब्य्रातील गडालाच सुरुंग लावण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील किमान आठ ते दहा माजी नगरसेवकांना गळाला लावत मुंब्रा येथील आव्हाड विरोधकांची मोट बांधण्याची रणनिती सध्या आखली जात असून, ‘मुंब्रा विकास आघाडी’ नावाने आव्हाडांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सविस्तर वाच...

15:22 (IST) 19 Jan 2023
“पंतप्रधानांच्या हस्ते गटाराचं उद्घाटन करावं, हे…”; मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून नाना पटोलेंचा भाजपाला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला आहे. एखाद्या गटाराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे, असे ते म्हणाले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा

14:53 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी बेकेसीमधील कमान कोसळली; जिवितहानी नाही

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे-कुर्ला संकुलात सभा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कमानी बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यापैकीच एक कमान कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही

14:52 (IST) 19 Jan 2023
नवी मुंबई : उरणमधील कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमधील दगड झाले बोलके

नवी मुंबई – उजाड माळरानाला एक सुंदर स्वरूप देण्याचे काम उरण परिसरातील सारडे या गावातील सारडे विकास मंचच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या उजाड माळरानातील दगडांवर विविध चित्रे काढून हा परिसर अधिक सुशोभित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 19 Jan 2023
लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने अरविंद सावंतांचा संताप; दीपक केसरकर म्हणाले, “हा कार्यक्रम…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या विविध प्रकल्पाच्या भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार नजर चुकीने घडला असावा, अशी असे ते म्हणाले. तसेच अरविंद सावंत यांनी आपला कार्यक्रम समजून उपस्थित राहावं, अशी विनंतीही त्यांनी केली. सविस्तर वाचा

13:56 (IST) 19 Jan 2023
Police Constable Recruitment : पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांचे अर्ज, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६८ हजार उमेदवार

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी असताना राज्यभरात साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयुर्वेदिक डॉक्टर, बी टेक, एम कॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनी अर्ज केले आहेत.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 19 Jan 2023
मुंबई : अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची महारेराकडून तपासणी

अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडून (महारेरा) फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होत आहे. अशा ३०० हून अधिक प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असली तरी सुरुवातीला ४० ते ४५ प्रकल्पांची छाननी होणार आहे.

सविस्तर वाचा

13:48 (IST) 19 Jan 2023
अब्दुल सत्तारांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांना…”

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी

13:08 (IST) 19 Jan 2023
आंबोली पोलिसांकडून राखी सावंतला अटक

एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राखीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळ्याने तिला अटक करण्यात आली.

13:04 (IST) 19 Jan 2023
वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी अकरा दिवस बंद राहणार

वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभालीचे काम पुणे महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद राहणार आहे.

सविस्तर बातमी

11:29 (IST) 19 Jan 2023
नागपूर : स्मशानभूमीत ‘ग्रीन जिम’, येथे मृतात्म्यांनाही लागतो…

करोनाने जगभरातच अनेकांना यमसदनी पाठवले. राज्याच्या उपराजधानीतही शेकडो लोकांना करोनाने मृत्यूच्या दारात लोटले. करोनाचा प्रादूर्भाव ओसरला आणि सारेच आरोग्याप्रती सजग झाले. यातून मृतात्मेही सुटले नाहीत.

सविस्तर वाचा

11:26 (IST) 19 Jan 2023
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. यामुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सविस्तर बातमी

11:21 (IST) 19 Jan 2023
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात उल्हासनगर मधील मोबाईल चोर अटक

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली आहे. ते उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून ९३ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 19 Jan 2023
गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्याच अधिसभेत ‘संघा’चे प्रयोग!

गोंडवाना विद्यापीठातील नवनिर्मित सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरवावरून पहिल्याच अधिसभेत सदस्यांमध्ये वादळी चर्चा झाली.

सविस्तर वाचा

11:01 (IST) 19 Jan 2023
गटातटात विभागलेले काँग्रेस नेते अडबालेंना मदत करणार?; चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र आणण्याचे आव्हान

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (विमाशि) उमेदवार सुधाकर अडबाले यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गटागटात विभागलेले काँग्रेसचे नेते अडबाले यांना निवडणुकीत मदत करतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सविस्तर वाचा

10:55 (IST) 19 Jan 2023
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी तोडली विद्यापीठाची भिंत, मुंबईत विद्यार्थी आक्रमक; म्हणाले, “राजकीय…”

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानिमित्त मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून उपस्थित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

10:29 (IST) 19 Jan 2023
पुणे : हिंदू जन आक्रोश मोर्चाचे रविवारी आयोजन

महेश पवळे म्हणाले,की शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

सविस्तर वाचा

Prime Minister Narendra Modi Mumbai Tour

नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली.