गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांवर ड्रोनची नजर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. काही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस देखील सज्ज झाले आहेत. दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी चार हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त असणार आहे. देहूत आणि आळंदीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होत असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे सोनसाखळी, पाकीट मारतात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी चार ड्रोन असणार आहेत. अशी माहिती पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त यांनी आज (शुक्रवारी) परिसराचा आढावा घेतला. पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने वारकरी आळंदीत आणि देहूत दाखल होत असतात. या आषाढी सोहळ्याच्या दरम्यान चोरटे फायदा घेऊन सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल हिसकावणे, पाकीट मारणे असे प्रकार घडतात. याच्यावरती पायबंध आणण्यासाठी अँटिक चैन स्नॅचिंग आणि चोर शोधक बारा पथके तैनात करण्यात आली आहेत. चोरट्यावर ड्रोनची नजर देखील असणार आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video

दोन्ही पालखी प्रस्थानासाठी असा असेल पोलिस बंदोबस्त

पोलिस आयुक्त- ०१
अप्पर पोलीस आयुक्त- ०१
पोलीस उपायुक्त- ०४
सहाय्यक पोलीस आयुक्त- १३
पोलीस निरीक्षक- ६२
सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलिस उप पोलीस निरीक्षक- २१४
अंमलदार- २,७३३
होमगार्ड- ४११
वॉर्डन- १५०
क्यू आर टी- ०१
आरसीपी-०५
एस आर पी एफ-०३
एनडीआरएफ- ०४

दोन्ही पालखी प्रस्थानासाठी परिसरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

बीडीएसची ०४ पथके, अँटी चेंज स्नॅचिंग व चोर शोधक पथक १२

ड्रोन कॅमेरा- ०४