राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनीही या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कोणी जाणुनबुजून महापुरुषांचा अपमान करणारी विधानं करत असल्यास रट्टा दिला पाहिजे असं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या मोर्चासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की “महापुरुषांबद्दल महाविकास आघाडीला प्रेम आहे ही चांगली गोष्ट आहे. राज्यपाल, चंद्रकांत पाटील किंवा संजय राऊत कोणीही असं विधान करायला नको होतं. पण शब्द चुकणं आणि जाणुनबुजून बोलणं हा मोठा फरक आहे”.

हा महाराष्ट्रद्रोह नाही का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विचारणा; म्हणाले “कसले डोंबलाचे मोर्चे…”

“महापुरुषांबद्दल कोणी जाणुनबुजून अपमानजनक बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्याला रट्टा दिला पाहिजे. पण कोणीही भांडवल महापुरुषांबद्दल राजकारण करु नये,” असंही यावेळी ते म्हणाले.

“कधीतरी आमच्याही तोंडातून चुकीचं वाक्य बाहेर पडतं. पण त्यानंतर लगेचच क्षमा मागत सामोरं गेलं पाहिजे. राज्यपालांनीही ते करण्यास हरकत नसावी,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. राज्यपालांची बदली म्हणजे ते आता घरीच जातील असं ते मिश्कीलपणे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला अखेर मुंबई पोलिसांची परवानगी, भाजपाच्या मोर्चावर म्हणाले “त्यांनाही अधिकार, आपला अजेंडा…”

“राज्यपालांनीदेखील अशी विधानं करु नयेत. याआधी त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दलही असं विधान केलं होतं. मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असं बोलणं उचित नाही. जाणुनबुजून कोणी बोलत असेल तर योग्य नाही. हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे,” असं बच्चू कडूंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prahar sanghtna bachchu kadu on mahavikas aghadi morcha governor bhagat singh koshyari bjp chandrakant patil sgy
First published on: 16-12-2022 at 18:05 IST