लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत काही बैठकादेखील पार पडल्या. मात्र, जागावाटपासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात भाष्य केले नाही. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. २६ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडी आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला असून एक यादी आमच्याकडे दिली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आमचे महाविकास आघाडीबरोबर भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता काही सांगू शकत नाहीत. प्रकाश शेंडगे आणि आमच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. त्यामध्ये ते कोणते मतदारसंघ मागतात, हे आम्ही ऐकूण घेतले”, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
Prakash Ambedkar on RSS PM Narendra Modi Mohan Bhagwat
‘RSS ने आम्हाला साथ द्यावी’, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन; म्हणाले, “मोदी संघाच्या मानगुटीवर…”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

हेही वाचा : दिल्लीत ताटकळलेल्या उदयनराजेंना धक्का? नरेंद्र पाटील यांचा सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर दावा

“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर आम्ही त्यांच्यामध्ये कुठे शिरायचे? आजही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असून तिढा कायम आहे. त्यांचा तिढा सुटला की नाही? याबाबत आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा तिढा मिटणार नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तरी काय उपयोग? आम्ही फक्त २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. २६ तारखेला वंचित बहुजन आघाडीची जी काही भूमिका असेल ती आम्ही स्पष्ट करणार आहोत”, असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला.

‘वंचित’चा शाहू महाराजांना पाठिंबा

कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. “शाहू महाराज छत्रपती यांना आमच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी जे काय प्रयत्न असतील ते पक्षाच्यावतीने केले जातील”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

काँग्रेसला ७ जागांवरील पाठिंब्याबाबत काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काँग्रेसला एक पत्र पाठवण्यात आले होते. यामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसल सात जागांवर पाठिंबा देण्यास तयार असल्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावावर अद्याप काँग्रेसच्या हायकमांडकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सात जागांसाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहोत. त्या सात जागा काँग्रेसने आम्हाला सांगाव्यात. त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहोत. येत्या २६ तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.