औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ शनिवारी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलो होते. मात्र, या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली होती. यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय टीका-टीप्पणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मुघल साम्राज्यात नाही झाला का? मुळात या देशात ब्रिटीश येण्यापूर्वी मुघल साम्राज्य होते आणि मुघलही याच मातीतले होते. त्यामुळे जलील यांच्या आंदोलनात औरंजेबाचा फोटो दिसला, त्याचं काही नवीन विशेष असं वाटत नाही. ज्यांना यावरून हिंदू-मुस्लिामांमध्ये भेद करायचा आहे, त्यांनी तो करावा, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बाबासाहेबांनी राजकारणातून जात, धर्म आणि विभाग वर्ज्य करायला सांगितले होते. मात्र, तरीही आज राजकारणात जात आणि धर्माचा वापर होतो, त्याचे परिणाम आज दिसत आहेत, असेही ते म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं?

नामांतर संघर्ष समितीच्यावतीने शनिवारपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. ‘आय लव्ह आौरंगाबाद’ असे फलक या आंदोलक तरुणांच्या हातात झळकत होते. मात्र, दुपारी अचानक काही तरुण आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले.

खासदार जलील यांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, या घटनेची कुणकुण खासदार जलील यांना लागल्यानंतर आणि त्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्यासाठी भूमिका मांडली. औरंगाबादच्या नामांतराला उद्योग, सर्वसामान्य जनतेतून विरोध होत असून आपल्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या उद्देशानेच काही तरुणांनी येथे औरंगजेबाचे छायाचित्र येथे प्रदर्शित केले. या घटनेशी एमआयएमचा कसलाही संबंध नसल्याचा खुलासा जलील यांनी केला.

हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार? कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलील यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा?

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे सचिव तैय्यब जफर यांनी नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, असे नाव कायम असेल तोपर्यंत आम्हीही शहराला औरंगाबाद म्हणू, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे खासदार जलील यांच्या नेतृत्वाखालील नामांतर विरोधातील आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे तैय्यब जफर यांनी जाहीर केले.