गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते, प्रकाश शेंडगे यांना इशारा दिला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नाहीतर, कमंडलबरोबर होता, हे दिसेल, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

शनिवारी ( २५ नोव्हेंबर ) मुंबईतील शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडीनं संविधान सभेचं आयोजन केलं होतं. तेव्हा प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर, कमंडलबरोबर होता. मग, ते प्रकाश शेंडगे असो किंवा छगन भुजबळ…”

हेही वाचा : “जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत, पण…”, गोपीचंद पडळकरांची जरांगे-पाटलांवर टीका

“जनता दल आणि त्याआधी जनता पक्षाबरोबर मिळून आम्ही ओबीसी आरक्षण मिळवलं आहे. आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून भिडवण्याची भाषा चालली आहे,” असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “सध्यात देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जातं आहे. २००२ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या,” असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.