सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुनःश्च संधी दिलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांपाठोपाठ आता महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही तीव्र विरोध केला आहे. पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पक्षाच्या मेळाव्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे.

प्रा. शिवाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. कुर्डूवाडी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका करण्यात आली. मागील वर्षात त्यांनी मित्र पक्ष म्हणून शिवसेनेलाच नव्हे तर सामान्य जनतेला गृहीतच धरले नाही. असा उमेदवार पुन्हा लादण्यात येऊ नये. अजून वेळ गेली नाही. आपण महायुतीचेच प्रामाणिकपणे काम करणार असून फक्त निंबाळकर यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी प्रा. सावंत यांनी केली.

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

रणजितसिंह निंबाळकर यांनी पुढील पाच वर्षांसाठी शिवसेनेने सांगितलेली सर्व समाजहिताची कामे करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष द्यावी. त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी निंबाळकर यांच्याकडून हमी घ्यावी आणि आम्हाला आदेश दिल्यास आम्ही निंबाळकर यांचा प्रचार करू, अशी अट प्रा. सावंत यांनी घातली आहे. यावेळी भाजपचे माढा तालुक्यातील नेते, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती, माजी सभागृहनेते शिवाजी कांबळे यांनी खासदार निंबाळकर यांच्यासह माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माढ्यात भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेले शिवसेना माढा विभाग संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी अलिकडेच थेट पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांचीही भावना हीच असल्याचे प्रा. सावंत यांनी सांगितले.