scorecardresearch

करोना संसर्गाची शक्यता: कोल्हापूरात रुग्णालय, मंदिरात प्रतिबंधात्मक नियोजन

वाढत्या करोनाच्या पाश्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना उद्या शुक्रवारपासून मूकपट्टी वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

करोना संसर्गाची शक्यता: कोल्हापूरात रुग्णालय, मंदिरात प्रतिबंधात्मक नियोजन
करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूरमध्ये प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियोजन

करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूरमध्ये प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियोजन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात करोना रुग्णांसाठी खाट आरक्षित करण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना उद्यापासून मुखपट्टी वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा- “नारायण राणेंची नार्को टेस्ट केली, तर मशीन बिघडून जाईल”, ठाकरे गटाचा खोचक टोला

चीनमध्ये करुणाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दक्षतेच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार कोल्हापूरमध्येही प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेतल्याचे दिसत आहे. छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात १४ अतिदक्षता तर २० प्राणवायूचे खाट आरक्षित केले आहेत. आवश्यक ती औषधे, यंत्रसामग्री याचीही तरतूद केली असल्याचे अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी सांगितले. नागरिकांनीही मूकपट्टीचा वापर करावा. गर्दीत जाण्याचे टाळावे. लसीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा- मुंबईत वातानूकुलीत लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना उद्या शुक्रवारपासून मूकपट्टी वापर करण्याच्या सूचना गुरुवारी करण्यात आल्या. मंदिरात देशभरातून दररोज दहा ते बारा हजार भाविक येत असतात. भाविक – कर्मचारी यांच्यात संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता म्हणून ही उपाय योजना करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी गुरुवारी सांगितले.

हेही वाचा- ‘Scam 2003 The Telgi Story’  वेबमालिकेविरोधात तेलगीच्या मुलीची न्यायालयात धाव

विमानतळावर ऐच्छिक सूचना

कोल्हापूर विमानतळावर ऐच्छिक स्वरूपात सूचना प्रवाशांना सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून करोना संसर्गासंदर्भात विमानतळ प्राधिकरणासाठी सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. तथापि कोल्हापूर विमानतळावर लोकांनी दुर्लक्ष प्रवाशांनी दुर्लक्ष करू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केली तर मुखपट्टी देण्याचे नियोजन केले आहे असे सूत्रांनी आज सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 21:14 IST

संबंधित बातम्या