Priyanka Gandhi in Shirdi : महाविकास आघाडीच्या निमित्ताने विभिन्न विचारधारा असलेले पक्ष एकत्र आले. शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या आघाडीने अडीच वर्षे राज्यात सत्ताही राबवली. परंतु, त्यानंतर झालेल्या फाटफुटीच्या राजकराणामुळे आघाडीचं सरकार कोसळलं अन् महायुतीचं सरकार आलं. त्यानंतरच्या संपूर्ण राजकीय प्रवासात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सातत्याने पाहायला मिळाली. लोकसभेच्या निमित्ताने एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीत सामना रंगल्यानंतर आता विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. यामध्ये दोन्हींकडचे स्टार प्रचारक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून आव्हानेही देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना दिलेलं आव्हान प्रियांका गांधी यांनी आज स्वीकारलं अन् त्यांना नवं चॅलेंज देऊ केलं. प्रियंका गांधी आज शिर्डीतून बोलत होत्या.

आमच्या विचारधारा वेगळ्या, पण…

उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा, असं आव्हान काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. तसंच, नरेंद्र मोदी यांनीही अशाप्रकारचे आव्हान सातत्याने दिलं आहे. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, “माझ्या भावाच्या संदर्भात नरेंद्र मोदी सतत बाळासाहेबांचं नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण आहे. मोदीजी ऐकून घ्या. बाळासाहेब ठाकरेंचं नाव ऐकून घ्या. हेही ऐकून घ्या, की आमची विचारधारा, आमच्या पक्षाचे विचार वेगवेगळे होते. परंतु, ना बाळसाहेब ठाकरे आणि नाही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला असता.

हेही वाचा >> “पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५० टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकणार असं जाहीर करा

असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना नवं चॅलेंज देऊ केलं. त्या म्हणाल्या, “माझं आव्हानही ऐका, मोदी आणि शाहांनी व्यासपीठावर उभं राहून जातीय जनगणना करणार असल्याचं जाहीर करावं. व्यासपीठावर उभं राहून त्यांनी म्हणावं की आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकणार. राहुल गांधींनी मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढली, त्या व्यक्तीबाबत तुम्ही म्हणता की ते आरक्षणाविरोधात आहेत.”