हिंदी चित्रपट निर्माते बोनी कपूर हे चित्रपटाचे शूटिंग संपवून मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांची मोटार ट्रॅक्टरवर आदळून अपघात झाला. या अपघातात बोनी कपूर व ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाले. लोणंद-फलटण रस्त्यावर चांदोबाचा िलब (तरडगाव) येथे हा अपघात झाला.
बोनी कपूर यांच्या ‘तेवर’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या खंडाळा येथे सुरू आहे. यात आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिनेता अर्जुन कपूर व अन्य आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. मागील काही दिवसांपासून त्याचे येथे चित्रीकरण सुरू आहे. काल रात्रीचे शूटिंग संपवून रात्रीच्या मुक्कामासाठी साखरवाडी येथील हॉटेलवर जात असताना चांदोबाचा िलब येथे त्यांची मोटार (क्रमांक- एम एच ०४ एफडब्ल्यू ५४००) ट्रॅक्टरवर आदळली. यात बोनी कपूर आणि ट्रॅक्टरचा चालक विजय गाडे किरकोळ जखमी झाले. तर कपूर यांच्या मोटारीचा चालक बचावला.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
खंडाळय़ाजवळ अपघातात निर्माते बोनी कपूर जखमी
हिंदी चित्रपट निर्माते बोनी कपूर हे चित्रपटाचे शूटिंग संपवून मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांची मोटार ट्रॅक्टरवर आदळून अपघात झाला. या अपघातात बोनी कपूर व ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाले.

First published on: 16-05-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producer boney kapoor injured in accident near khandala